रेल्वेने प्रवास करताय... या उशी, ब्लॅंकेट ठेवा सोबत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

कोरोनाची बाधा टाळण्यासाठी एक्‍स्प्रेस गाड्यांची स्वच्छता; वातानुकूलित गाड्यांमधील पडदे, बेडशिट, ब्लॅंकेट हटवले, मध्य रेल्वेची उपाययोजना

मुंबई ः कोरोना विषाणूची बाधा टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या मध्य रेल्वेच्या एक्‍स्प्रेस गाड्यांमधील साहित्याची स्वच्छता करण्यात येत आहे. लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांमधील वातानुकूलित डब्यांमधील पडदे, बेडशिट, ब्लॅंकेटच्या स्वच्छतेसाठी मध्य रेल्वेच्या मेन्टेनन्स डेपोकडून ते हटवून संपूर्ण स्वच्छता करण्यात येत आहे.

टीव्‍ही मालिका, चित्रपटांचे शूटींग ३१ मार्चपर्यंत बंद! 

रेल्वे मंत्रालयाने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वे विभागाने विशेष काळजी घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. रेल्वे स्थानकांवर कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे फलक लावण्यात आले आहेत; तर उपनगरी गाड्यांमध्ये तसेच रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेसंबंधी उद्‌घोषणा केल्या जात आहेत. उपनगरी गाड्यांमधील हॅंडल, खांब, लोखंडी सळ्या, खिडक्‍या, आसनांचे निर्जंतुकीकरण केले जात असून या गाड्या आतून-बाहेरून धुतल्या जात आहेत.

सुंदर समुद्रकिनारे, गड सुनेसुने

लांब पल्ल्याच्या एक्‍स्प्रेस गाड्यांमध्येही कामगारांकडून स्वच्छता केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शौचालय, गाडीतील स्वच्छता, खिडक्‍या आणि आसनांची स्वच्छता केली जात आहे. गाडीतील तिकीट तपासणीसांनाही यासंदर्भातील सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. त्यासह वातानुकूलित डब्यांमधील पडदेही काढण्यात आले आहेत. 

कोरोना' विषाणूंवर तयार होणार चित्रपट; नाव काय आहे माहितीये ? वाचा...

प्रवासादरम्यान उशी, बेडशिट सोबत घ्या 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील वातानुकूलित डब्यांमध्ये सध्या विशेष काळजी घेतली जात आहे. डब्यांमधील बेडशिट, उशा, ब्लॅंकेट स्वच्छतेसाठी काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांनी आता उशीसोबत बेडशिट आणि ब्लॅंकेटसारख्या सुविधा आपल्यासोबत घेऊन प्रवास करावा लागणार आहे.

Curtains, bedsheets, blankets removed in air-conditioned cars


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curtains, bedsheets, blankets removed in air-conditioned cars