कळंबोलीत रात्रीच्या अंधारात असंख्य झाडांची कत्तल; पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 19 September 2020

सायन-पनवेल महामार्गा लगतचीलगतच्या सुमारे दहा ते बारा वृक्षांची कत्तल रात्रीच्या अंधारात अज्ञातांनी केल्याची घटना कळंबोली या ठिकाणी उजेडात आली आहे.

नवीन पनवेल: सायन-पनवेल महामार्गालगतच्या सुमारे 10 ते 12 झाडांची कत्तल रात्रीच्या अंधारात अज्ञातांनी केल्याची घटना कळंबोलीत घडली आहे. या वृक्षतोडीविरोधात भाजप कळंबोली शहर सरचिटणीस प्रशांत रणवरे यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त आणि नवी मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली आहे.

महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती सक्तीची उपस्थितीला प्राध्यापकांचा विरोध; अध्यादेश रद्द करण्याची मागणी

कळंबोली येथे रात्रीच्या अंधारात वृक्षतोड करून झाडांच्या फांद्या त्याच ठिकाणी अस्ताव्यस्त टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वृक्षतोडीचा हेतू अस्पष्ट दिसत आहे. तरी पनवेल महापालिका प्रशासनाने या रात्रीच्या अंधारात झालेल्या वृक्षतोडीचा कोणाला फायदा होऊ शकतो, याचा छडा लावून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. यापूर्वी कळंबोलीतच होल्डिंगसाठी झाडांची कत्तल केल्याची घटना घडली होती. ही घटना अशाच स्वरूपाची असू शकते, अशी शक्यता नागरिक करत आहेत. या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. पालिका अधिकारी समीर जाधव यांनी घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण; संपर्कातील व्यक्तींना चाचणी करून घेण्याचे आवाहन

पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे
पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन साधण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने वृक्षलागवडीची मोहीम हातात घेतली आहे. सरकारने 33 कोटी वृक्षलागवड करण्याचे ठरवले होते; मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही होत असल्याचेही दिसून येत आहे. या वर्षाच्या पावसाळ्यात दोन वेळा झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शेकडो वृक्ष उन्मळून पडले होते. त्यामुळे शहरातील वृक्षराजींची अपरिमित हानी झाली. एकीकडे दर वर्षी पावसाळी मोसमामध्ये चक्रीवादळाच्या तडाख्यात वृक्ष पडण्याचे प्रमाण वाढत असतानाच, वृक्षतोडीसारख्या दुर्दैवी घटनाही घडत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cutting of innumerable trees in Kalamboli