सर्वात मोठी बातमी - चीनी हॅकर्सकडून 5 दिवसात 40 हजार सायबर हल्ले...

सर्वात मोठी बातमी - चीनी हॅकर्सकडून 5 दिवसात 40 हजार सायबर हल्ले...

मुंबई : सध्याच्या काळात भारत-चीन बॉर्डरवरील वाद पाहता, चीनी हॅकर्सकडून गेल्या पाच दिवसात 40 हजार 300 सायबर हल्ल्यांचे प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. या हल्ल्यांसाठी सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

बँक, मुलभत सुविधा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहेत त्यांच्यावरील चीनकडून होणा-या सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे विशेष महानिरीक्षक(सायबर) यशस्वी यादव यांनी सांगितले. 40 हजार 300 असे हल्ले झाले असून त्यातील बहुसंख्य हल्ले चीन मधील चेंगडू परिसरातून करण्यात आले आहेत, असे यादव यांनी स्पष्ट केले.तीन प्रकारचे हे हल्ले आहेत. त्यात डियानल ऑफ सर्विस, इंटरनेट प्रोटोकॉल हायजॅकिंग व फिशिंग या हल्ल्यांचा समावेश आहे. विशेष करून सरकारी विभागाना टार्गेट करण्यात येत आहे.

चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा कट रचला आहे. यामध्ये एक ई-मेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स ncov2019@gov.in या ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहेत. या सायबर हल्लयामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. तुम्हाला आकर्षित करणारा, आर्थिक प्रलोभन देणारा विषय असलेला ई-मेल पाठवला जाईल. जसे की मोफत कोविड चाचणी, मोफत कोविड किट, त्या ई-मेलमध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा ई-मेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अशा प्रकारच्या खोट्या सरकारी ई-मेलवरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते.

तुम्ही कशी काळजी घ्याल :

  • महाराष्ट्र सायबरकडून सर्व नागरिकांना विनंती करते की वरील कोणत्याच प्रकारच्या ई-मेला प्रतिसाद देऊ नका. 
  • covid2019@gov.in / ncov2019.gov.in या ई-मेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका.
  • सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईलसाठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत अँन्टी व्हायरस वापरावा असंही सायबर सेलकडून सांगण्यात येतंय. 
  • याचसोबत संगणकातील सॉफ्टवेअर आणि मोबाईलमधील अँप नियमितपणे अपडेट करा.
  • कठीण आणि मोठे पासवर्ड ठेवा. तुमचे पाश्वर्ड्स नियमितपणे बदलत राहा. तुमच्या महत्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्या.
  • प्रलोभने देणारे संशयास्पद ई-मेल उघडू नये. त्यातील लिंकवर क्लिक करू नये. त्यातील अटॅचमेंट डाउनलोड करू नये आणि उघडू नये.
  • खोट्या आणि प्रलोभने देणा-या इमेल आणि वेबसाईट पासून सावध राहा. असुरक्षित आणि संशयास्पद वेबसाईटवर तुमची महत्वाची माहिती जसे की युजर नेम, पासवर्ड, कार्ड नंबर, पिन नंबर, ओटीपी तसेच इतर गोपनीय माहिती टाकू नका.

cyber department share crucial information about cyber attacks in last five days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com