दुपारी मुंबईच्या समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता

मुंबईत वादळी वाऱ्यांमुळे पडझड सुरु झाली.
Heavy rains will increase in Mumbai on Sunday
Heavy rains will increase in Mumbai on Sunday

मुंबई: अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या वादळाचा तडाखा (Mumbai cyclone taukate) मुंबईला बसण्यास सुरवात झाली आहे. वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईसह रायगड ठाणे पालघर जिल्ह्यांच्या काही भागात दुपार पर्यंत ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने वाहाण्याचा अंदाज वेधशाळेने (IMD) वर्तवला आहे. मुंबई रायगड किनाऱ्या पासून 150 ते 200 किलोमिटर अंतरावर हे वादळ घोंगावत असून संध्याकाळ पर्यंत गुजरातच्या किनाऱ्यावर (Gujarat coast) पोहचण्याचा अंदाज आहे. गुजरात आणि दिव दमणच्या किनाऱ्यावर हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. (cyclone taukate in afternoon time big waves possibility )

मुंबईत वादळी वाऱ्यांमुळे पडझड सुरु झाली असून आता पर्यंत 34 झाडे पडल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. किनाऱ्यावरील रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी 3 वाजल्याच्या सुमारास सुमारास समुद्राला 4 मीटरची भरती आहे. या काळात वाऱ्याचा वेग जास्त राहील्यास मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

Heavy rains will increase in Mumbai on Sunday
मुंबईत वरळी कोळीवाडा, दादर हिंदमाता भागात पाणी भरलं

किनाऱ्यावरील नागरीकांना वेळ पडल्यास सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पालिकेने सर्व यंत्रणा दक्ष ठेवली आहे. कुलाबा येथील गिता नगर,वरळी कोळीवाडा,वर्सोवा तसेच जुहू मधील काही भागातील नागरीकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. अत्यावश्‍यक काम नसल्यास घरा बाहेर न पडण्याचा सल्ला पालिकेने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com