
दादरमधील ऐतिहासिक कबुतरखान्यावरील बंदीवरुन जैन समाज आक्रमक झाला असून समाजाने आंदोलन सुरु केले. काही वेळात हे आंदोलन मागे घेण्यात आहे. यावेळी आंदोलकांची पोलिसांशी झटापट देखील झाली. दरम्यान मंत्री मंगलप्रभात लोढा हे आंदोलनस्थळी पोहोचले आणि त्यांनी जैन समाजाच्या ट्रस्टींशी चर्चा केली. या आंदोलनात बाहेरील लोक घुसले त्यांनी गोंधळ घातल्याची माहिती ट्रस्टींनी दिल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.