Dahi Handi 2023: लोकसभेची हंडी मोदीचं फोडणार; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

राज्य सरकारही विकासाचे थर लावत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
Tembhi Naka_Eknath Shinde
Tembhi Naka_Eknath Shinde

मुंबई : दहीहंडीनिमित्त देशभरात सध्या उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतही नेहमीच्या उत्साहात दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज आहेत. ठाण्यातील टेंभी नाका मित्रमंडळाच्या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.

तसेच २०२४ ची दहीहंडी नरेंद्र मोदींच फोडणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Dahi Handi 2023 Lok Sabha handi will break only Narendra Modi CM Eknath Shinde expressed his belief)

Tembhi Naka_Eknath Shinde
MK Stalin: मुलगा उदयनिधींच्या 'सनातन' विधानावर CM स्टॅलिन यांनी सोडलं मौन! PM मोदींना दिला सल्ला

परंपरा टिकली पाहिजे

शिंदे म्हणाले, टेंभी नाक्यातील सर्व गोविंदा सर्वात आधी आनंद दिघेंच्या दहीहिंडीला सलामी देतात. आजही त्यांच्यात दहीहंडीचा उत्साह कायम आहे. त्यामुळं सर्वात आधी या गोविंदांना शुभेच्छा. तरुणाईचा प्रचंड उत्साह इथं पहायला मिळतो आहे. (Latest Marathi News)

ही आपली परंपरा आहे, ही संस्कृती आहे. हे सण, उत्सव वाढले पाहिजेत, ही भावना मनात ठेऊन आनंद दिघेंनी गोविंदा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे अनेक सण सुरु केले. सनातन धर्मातही या गोविंदा उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. (Marathi Tajya Batmya)

Tembhi Naka_Eknath Shinde
India or Bharat Row: "इंडिया की भारत? हा वाद कसला घालता, त्यापेक्षा..."; चीनचा भारताला सल्ला

मोदीच लोकसभेची हंडी फोडतील

राज्य सरकार ज्याप्रमाणं विकासाचे थर लावत आहे, त्याचप्रमाणं इथले गोविदा पथकांकडून विकासाचे थर लावले जात आहेत. अहंकाराचे थर कोसळले आणि विकासाचे, प्रगतीचे थर आता सुरु झालेले आहेत.

देशात आणि राज्यात मोदींविरोधात सर्व इंडिया आघाडीचे लोक एकत्र येत आहेत. ते कितीही एकत्र आले तरी २०२४ ची लोकसभेची हंडी नरेंद्र मोदींच फोडतील, असा विश्वास सर्व देशवासियांना आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Tembhi Naka_Eknath Shinde
Smriti Irani on Udayanidhi: "जोपर्यंत भक्त जिवंत आहेत..."; सनातनविरोधी विधानावरुन स्मृती इराणींचा उदयनिधींना प्रत्युत्तर

१० लाखांचं वीमा कवच

यावर्षी सरकारनं प्रोगोविंदा आयोजित केलं, साहसी खेळात याचा समावेश केला. तसेच प्रत्येक गोविंदाला १० लाखांचं वीमा कवच दिलं. अपघात झाले तर त्यांच्या उपचारांचा खर्च सरकारनं उचलला आहे. तसेच या गोविंदांना सुटी देखील जाहीर केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com