

Dahisar Garage Fire Video
ESakal
मुंबई : दहिसर पूर्व येथे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोकुळानंद हॉटेलजवळ सर्व्हिस रोडवरील गॅरेजच्या दुकानाला ही आग लागली असून या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती आहे.