कोरोनापासून अलिप्त असलेल्या 'पाली' गावातही वाढला धोका, कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

सुधागड तालुक्यात मे महिन्यात कोरोनाने शिरकाव केला. नागशेत येथील एका 62 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यानंतर 2 जून रोजी गोमाशी येथील 24 वर्षीय तरुणचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

पाली : सुधागड तालुक्यातील कोरोनाचे 2 रुग्ण नुकतेच बरे होऊन घरी परतले. मात्र तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेले पाली कोरोनापासून दूर होते. शनिवारी (ता.27) एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. खबरदारी म्हणून रविवार (ता.28) ते बुधवार (ता.1) पाली बाजारपेठ बंद राहणार आहे.

हेही वाचा : कोरोना मागोमाग लागूनच मुंबईवर येऊ शकतं 'हे' मोठं संकट; मुंबईकरांना वाचवणार आता एकच गोष्ट...

या तरुणाच्या घरातील 10 जणांना क्वारंटाईन केले असल्याची माहिती तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली. तसेच पाली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आलाप मेहता, विक्रांत चौधरी यांनी खबरदारी म्हणून पाली बाजारपेठ 4 दिवस बंद राहणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण..

सुधागड तालुक्यात मे महिन्यात कोरोनाने शिरकाव केला. नागशेत येथील एका 62 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यानंतर 2 जून रोजी गोमाशी येथील 24 वर्षीय तरुणचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र काही दिवसांपूर्वी हे दोन्ही रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे सुधागड तालुका कोरोनामुक्त झाला होता.

danger also increased in Pali which was detached from the corona positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: danger also increased in Pali which was detached from the corona positive