पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, या मंत्र्यांची लागणार वर्णी..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

बहुमत चाचणी नंतर आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आता समोर येतेय. बातमी आहे उद्धव ठाकरे सरकारसंदर्भातली. पुढच्या 12 दिवसानंतर उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. 

मुंबई : बहुमत चाचणी नंतर आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आता समोर येतेय. बातमी आहे उद्धव ठाकरे सरकारसंदर्भातली. पुढच्या 12 दिवसानंतर उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. 

येत्या १२ डिसेंबरला ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या विस्तारात 14  मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आम्हाला EXCLUSIVE माहिती मिळालीय.

महत्त्वाची बातमी बहुमत सिद्ध केल्यानंतरही, राजकारणाला वेगळं वळण शक्य; काय आहे शक्यता?

या विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिनही पक्षांचे मिळून एकूण 14  मंत्री शपथ घेणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत 6  मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर आता येत्या १२ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

या विस्तारात कुणाकुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.  दरम्यान पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात जे मंत्री शपथ घेतील त्यांच्यापैकी 7 मंत्री अनुभवी असल्याचं बोललं जातायत तर काही नवीन चेहऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात येणार आहे. 

महत्त्वाची बातमी :  बहुमत चाचणीनंतर अमित शहा आता महाराष्ट्रात!
 

आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेलेत. 288 सदस्य संख्या असलेल्या सभागृहात महाविकास आघाडीने 169 - 0 अशी बहुमत चाचणी जिंकली. आता उद्या सभागृहात विधानसभा अध्यक्ष निवड करण्यात येणार आहे. 

Webtitle : date of cabinet expansion is fixed check who will get chance in first cabinet expansion


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: date of cabinet expansion is fixed check who will get chance in first cabinet expansion