esakal | Coronavirus : राज्यात कोरोना अवरेना, दिवसभरात 'इतक्या' नव्या रुग्णांची भर आणि बरे होणाऱ्यांची संख्या...
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

मृतांमध्ये 63 पुरुष व 34 महिलांचा समावेश आहे. दगावलेल्या रुग्णांपैकी 37 जण 60 वर्षे किंवा त्यावरील, 49  जण 40 ते 59 वर्षे वयोगटातील आणि 11 जण 40 वर्षांखालील होते.

Coronavirus : राज्यात कोरोना अवरेना, दिवसभरात 'इतक्या' नव्या रुग्णांची भर आणि बरे होणाऱ्यांची संख्या...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात मंगळवारी आणखी 97 कोरोनाबळींची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 1792 वर गेला. कोव्हिड-19 ची बाधा झालेल्या 2091 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या 54,758 झाली आहे. राज्यात सध्या 36,004 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत 16,954 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

नक्की वाचा : एसटी कामगारांची इम्युनिटी वाढवण्यासाठी 'हे' औषध द्या..महाराष्ट्र एसटी कामगार सेनेनं केली मागणी    

राज्यात कोरोनाच्या आणखी 97 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली. मुंबईत39, ठाण्यात 15, कल्याण-डोंबिवलीत 10, पुण्यात आठ , सोलापुरात सात; तसेच औरंगाबाद व मिरा-भाईंदरमध्ये प्रत्येकी पाच, मालेगाव आणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी तीन, तर नागपूर शहर आणि रत्नागिरीत प्रत्येकी एका रुग्णाचे निधन झाले.

मोठी बातमी थरकाप उडवणारा फोटो : KEM रुग्णालयातील शवागृह भरलं, मृतदेह ठेवलेत चक्क 'इथे'...

मृतांमध्ये 63 पुरुष व 34 महिलांचा समावेश आहे. दगावलेल्या रुग्णांपैकी 37 जण 60 वर्षे किंवा त्यावरील, 49  जण 40 ते 59 वर्षे वयोगटातील आणि 11 जण 40 वर्षांखालील होते. एकूण 65 जणांना (67 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोव्हिड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1792 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये 1168 जणांची भर पडली; राज्यात आतापर्यंत 16,954 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत तपासणीसाठी पाठवलेल्या 3,90,170 नमुन्यांपैकी 54,758 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2562क्लस्टर कंटेनमेंट झोन क्रियाशील असून, मंगळवारी 16,780 पथकांनी  65.91  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केले.  

महत्वाची बातमी संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, महाराष्ट्रातील सरकारबाबत केलं 'मोठं' भाष्य...

  • आतापर्यंत कोरोनामुक्त : 16,954 
  • होम क्वारंटाईन: 5,67,622
  • संस्थात्मक क्वारंटाईन : 35,200

with in a day 2091 new corona positive in maharashtra Death toll 1792