
कल्याणमधील गौरीपाडा परिसरात दोन बगळे मृतावस्थेत आढळले आहेत. गौरीपाडा परिसरातील गुरु आत्मन या इमारती लगत एका झाडाखाली हे दोन पक्षी मृत आढळून आले.
मुंबईः कल्याणामधील गौरीपाडा परिसरात दोन बगळे मृतावस्थेत आढळले आहेत. मागील काही दिवसांपासून देशभरात बर्ड फ्लूने पक्षी मृत होत असल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परिसरातील सर्वेक्षण सुरु केले आहे. पशुवैद्यक विभागाकडून या पक्षांचे मृतदेह पुढील चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ प्रतिभा पान पाटील यांनी दिली.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
गौरीपाडा परिसरातील गुरु आत्मन या इमारती लगत एका झाडाखाली हे दोन पक्षी मृत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. काही दिवसांपूर्वी या परिसरात पाच ते सहा पक्षांचा मृत्यू झाल्याचे रहिवाशांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यक विभागाकडून या पक्षांचे मृतदेह चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेनं मार्गदर्शक सूचनांनुसार एक किलोमीटर परिघामध्ये सर्वेक्षण सुरु केले आहे.
हेही वाचा- कोरोनामुळे आर्थिक कणा मोडलेले चिकन विक्रेते पुन्हा संकटात
-------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Death crane Kalyan corona bird flu