पतंग आला..; चिमुकल्याला घेऊन गेला!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

मकरसक्रांतीनिमित्त पतंगबाजी करण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १६) घडली आहे. याबाबत तुळिंज पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पालघर : मकरसक्रांतीनिमित्त पतंगबाजी करण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १६) घडली आहे. याबाबत तुळिंज पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ही बातमी वाचली का? दाऊदला तुडवणारा करिम लाला होता तरी कोण?

वंश चंडालिया असे या मुलाचे नाव असून तो नालासोपारा पूर्वेकडील आदर्श नगरमध्ये वास्तव्यास होता. बुधवारी मकरसंक्रांती असल्याने वंश सायंकाळी पतंगबाजी करण्यासाठी म्हणून बाहेर गेला होता; मात्र रात्र उलटली तरी तो घरी परतला नसल्याने त्याचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. दरम्यान, गुरुवारी सकाळी जवळच सुरू असलेल्या एका इमारतीच्या अर्धवट कामाच्या ठिकाणी पाण्याच्या टाकीजवळ वंशची एक चप्पल आढळून आली. यानंतर टाकीतील पाणी उपसल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला.

ही बातमी वाचली का? पालीजवळ बस अपघातात २० विद्यार्थी जखमी

दरम्यान, हा मृत्यू बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी बिल्डरविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. तर दुसरीकडे पतंग पकडण्याच्या नादात वंश टाकीत पडला असल्याचा अंदाज स्थानिक व्यक्त करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of Little boy running behind a kite in palghar