esakal | कळवा रेल्वेस्थानकात 'मृत्यूची दरी'
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कळवा रेल्वेस्थानकात 'मृत्यूची दरी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : लोकल प्रवासामध्ये एखाद्या स्थानकात गाडी शिरण्यापूर्वी 'कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान आणि फलाटामधील अंतराकडे लक्ष असू द्या' अशी उद्घोषणा नेहमी होते. कळवा रेल्वेस्थानकात डाऊन मार्गावर ठाणे दिशेकडे उतरणाऱ्या महिला प्रवाशांना या सूचनेकडे कानाडोळा करणे जीवावर बेतू शकते.

कारण या स्थानकात गाडीचे पायदान आणि फलाटामध्ये जवळपास दीड ते दोन फुटांचे अंतर आहे. त्यामुळे एखाद्या दुर्घटनेपूर्वी प्रशासनाने हा प्रकार गांभीर्याने घेऊन फलाट आणि लोकलमधील अंतर भरून काढावे, अशी मागणी जोर धरत आहे. कळवा स्थानकात प्रबंधकांच्या कार्यालयासमोरच फलाटावर भलेमोठे भगदाड पडले आहे. नेमक्या या भगदाडासमोरच महिला वर्गाचा डबा येतो. गडबडीत लोकलमधून उतरताना एखादी महिला खाली पडण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रवासी संघाने वारंवार स्थानिक प्रशासनाला ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिली. तसेच रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वेचे 'डीआरएम' यांना ट्विट करून दुरुस्तीची मागणी केली आहे.

हेही वाचा: आईचा एकच टाहो! माझ्या मुलाचा मृतदेह मला आणून द्या

मंगळवार (ता. १२) पासून समाज माध्यमावर याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रवासी महिला आपला जीव मुठीत घेऊन हे भगदाड चुकवत फलाटावर उतरताना पाहायला मिळतात. भविष्यात एखाद्या |लोकल प्रवाशाचा जीव गेल्यानंतरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत.

loading image
go to top