दिघा रेल्वेस्थानकासाठी तारीख पे तारीख;  काम पूर्ण होण्यास डिसेंबर 2021 डेडलाईन 

दिघा रेल्वेस्थानकासाठी तारीख पे तारीख;  काम पूर्ण होण्यास डिसेंबर 2021 डेडलाईन 

वाशी : ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे व ऐरोली रेल्वेस्थानकांदरम्यानच्या दिघा रेल्वेस्थानकाचे काम मुंबई रेल्वे विकास कार्पीरेशन करत आहे. हे काम मार्च 2020 मध्ये हे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ते रखडले आहे. आता यासाठी डिसेंबर 2021 ही नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. खासदार राजन विचारे यांनी नुकताच दिघा रेल्वेस्थानकांच्या कामांचा पाहणी दौरा केला होता. 

दिघा रेल्वेस्थानकांचे कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2016 मध्ये करण्यात आले. मात्र तांत्रिक कारणामुळे हे काम रखडले होते. त्यानंतर तब्बल 14 महिन्यांनी म्हणजे 7 मे 2018 रोजी या प्रकल्पाला प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते दिघा रेल्वेस्थानकाच्या प्रस्तावित जागेच्या ठिकाणी भूमिपूजनही करण्यात आल्यानंतर स्थानकाचा फलक उभारण्यात आला. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नव्हती. या रेल्वेस्थानकांच्या आराखड्यामध्ये बदल करण्यात आला. निविदा प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे ऑक्‍टोबर 2018 मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. 111 कोटी रुपये खर्च करून उभ्या करण्यात येणाऱ्या मार्च 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम रखडले आहे. 

हे वाचा : दाऊदची मालमत्ता लिलाव होणार 

प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानकांच्या परिसरातील झाडे, भूमिगत वीजवाहिन्या, महानगर गॅस वाहिन्या यांचा कामाचा अडथळा आला होता. या अडथळ्यांमुळे सब-वेचे काम करणे बाकी होते. त्यातच मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कामगारांची कमतरता यामुळे काम पुढे गेले आहे. आता डिसेंबर 2021 पर्यंत काम होणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन संचालक एस. एस. खुराना यांनी स्पष्ट केले. 

खासदार संतापले 
दिघा रेल्वेस्थानकांचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे खासदार राजन विचारे यांनी मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन अधिकांऱ्यावर संताप व्यक्त केला. तसेच हे काम लवकरात लवकर काम पूर्ण करावे, असे आदेश दिले. दिघा रेल्वे स्थानकांमुळे विटावा, गणपती पाडा, आनंद नगर, दिघा, विष्णुनगर येथील रहिवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com