

Maharashtra Fishing
ESakal
मुंबई : माशांच्या प्रजननाच्या काळात त्यांचे संरक्षण करण्यासाठी, तसेच सागरी जीवसृष्टीची पुनर्निर्मिती आणि राज्याच्या किनारपट्टीवरील परिसंस्थेचे दीर्घकालीन आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात ही मासेमारी बंदी लागू केली जाते. त्यानंतर आता ही वार्षिक बंदी संपल्यानंतर महाराष्ट्रात खुल्या समुद्रातील मासेमारी पुन्हा सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून १२ सागरी मैल अंतरापर्यंत मासेमारीवरील निर्बंध १५ ऑगस्टपर्यंत कायम राहतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.