काय सांगता ! हरिण छत फोडून थेट घरात, नक्की घडलं तरी काय?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

पवई येथील हनुमान टेकडी परिसरातील स्थानिक रहिवाशी  सविता सिंग यांच्या घरात पत्र्यावरून रात्री 12.30 च्या दरम्यान एक हरण पडले होते. 

धारावी :  पवई येथील हनुमान टेकडी परिसरातील स्थानिक रहिवाशी  सविता सिंग यांच्या घरात पत्र्यावरून रात्री 12.30 च्या दरम्यान एक हरण पडले होते. 

मोठी बातमी अडकलेल्या नागरिकांनो! घरी जाण्यासाठी ST महामंडळाशी असा साधा संपर्क

ही माहिती मिळताच पॉज-मुंबई ए.सी.एफ. चे स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू घटनास्थळी दाखल झाले व सदरची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे वनपाल रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर हरणाला वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणीमित्र संघटनेचे स्वयंसेवकांनी त्या हरणाला पकडले व पुढील वैद्यकीय तपासणीसाठी व उपचारासाठी नेण्यात आले.

नक्की वाचा : लॉकडाऊनमुळे नोकरी मिळत नाहीये?..घाबरू नका.. अशी मिळवा नोकरी

या विभागांमध्ये हरिण डोंगरावरून पडलेल्याची ही दुसरी घटना आहे. अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांनी सांगितले.

Deer go straight from the roof into the house, what exactly happened?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deer go straight from the roof into the house, what exactly happened?