संत गाडगेबाबांना भारतरत्न देण्याची मागणी! वाचा कोणी केली ही मागणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 February 2020

संत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, राज्यातील धोबी समाजाचा समावेश अनुसूचित जातीत करावा, आदी मागण्या राष्ट्रीय रजक महासंघाने आज आझाद मैदानात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात केल्या. धोबी परीट समाजावर अन्याय झाला असून अनुसूचित जातींमधून त्यांना वंचित ठेव

मुंबई : संत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, राज्यातील धोबी समाजाचा समावेश अनुसूचित जातीत करावा, आदी मागण्या राष्ट्रीय रजक महासंघाने आज आझाद मैदानात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात केल्या. धोबी परीट समाजावर अन्याय झाला असून अनुसूचित जातींमधून त्यांना वंचित ठेवण्यात आले, अशी खंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

शिवसेनेचा रंग भगवाचं..! मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा टीकाकारांना टोला 

आम्ही संत गाडगेबाबा यांच्या विचारांवर काम करणारे आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "स्वच्छ भारत अभियान' सुरू केले. मात्र, त्याचे उगमस्थान हे गाडगेबाबा आहेत. गाडगेबाबा यांच्या विचारांवर देशाचे सरकार चालते, असे फडणवीस म्हणाले. धोबी परीट समाजावर अन्याय झालेला असून अनुसूचित जातींमधून त्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. त्यासाठी वीस वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. या समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यासाठी आमच्या सरकारने भांडे समितीचा अहवाल लागू करण्याचा प्रयत्न केला. हा अहवाल पुढे जाऊ नये, असे प्रयत्न काही जणांनी केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारने हा अहवाल केंद्राला पाठवला असल्याचे ते म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या वेळी उपस्थित होते. या समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. राज्यासह कर्नाटक, तामिळनाडू, गोवा, मध्य प्रदेश, पंजाब, हरयाणा, जम्मू-कश्‍मीर आदी राज्यांतील रजक धोबी समाज अनेक वर्षांपासून लढा देत असल्याचे महासंघाचे दिनेश चौधरी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for giving BharatRatna to Sant Gadgebaba