esakal | भाजीपाला खरेदीसाठी ठाणेकरांची पायपीट
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भाजीपाला खरेदीसाठी ठाणेकरांची पायपीट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : पालिका (Municipal) अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर ठाणे (Thane) पालिकेने फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत असले, तरी ठाणेकरांच्या (Thane) भाजीपाल्याचे वांदे होत असल्याचे समारे आले आहे.

प्रत्येक प्रभागात अधिकृत भाजीमंडईची सोय नसल्याने साधा कढीपत्ता घेण्यासाठीही नागरिकांना थेट जांभळीनाका किंवा गावदेवी मंडई गाठावी लागत आहे.

हेही वाचा: सहायक आयुक्त हल्ला प्रकरण, पालिका अधिकाऱ्यांकडून निषेध

भाजी मंडई हवी !

मागील तीन ते चार दिवसांपासून पालिका अनधिकृत फेरीवाल्यांवर करत असलेल्या कारवाईचे आम्ही समर्थनच करतो; मात्र प्रत्येक प्रभागात भाजी मंडई अथवा अधिकृत फेरीवाला क्षेत्र तयार केले पाहिजे, असे नम्रता पवार (ग्राहक) यांनी सांगितले.

दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे पायपीट करत किंवा रिक्षाने प्रवास करत मंडईत जावे लागत आहे. आता गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. अशा वेळी प्रत्येक प्रभागात पर्यायी मंडई उभारून गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

loading image
go to top