कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणकारी हळदीची मागणी वाढली, रोज इतक्या टन हळदीची विक्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणकारी हळदीची मागणी वाढली, रोज इतक्या टन हळदीची विक्री

नवी मुंबई : जंतुनाशक म्हणून गुणकारी औषध ओळख असणाऱ्या हळदीची कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढली आहे. ग्राहकांकडून हळदीची मागणी होत असल्यामुळे बाजारात पुन्हा एकदा तेजी निर्माण झाली आहे. वाशीतील मसाला मार्केटमध्ये 10 ते 15 टक्‍क्‍यांनी हळद खरेदी वाढली आहे. सांगलीतील हळदीचा दर्जा सर्वाधिक चांगला असल्यामुळे, त्या ठिकाणाहून रोज 200 टन हळदीची विक्री होत असल्याचे एका हळद व्यापाऱ्याने सांगितले.

स्वयपांक करताना आवर्जून वापरली जाणारी हळद ही जंतुनाशक असल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे, रक्त शुद्ध होणे, त्वचारोग बरा करण्यासाठी आयुर्वेदात हळदीचा वापर केला जातो. हजारोंना मृत्यूच्या कवेत ओढणाऱ्या कोरोना विषाणूवर औषध नसल्यामुळे प्रत्येकाने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ज्याचे शरीर निरोगी व रोगप्रतिकारक शक्ती चांगली अशांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काही लोकांकडून हळदीचा वापर अधिक वाढला आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात निजामाबाद आणि राजापुरी (सेलम) जातीच्या हळदीचे पीक घेतले जाते.

महाराष्ट्रात सांगलीत राजापुरी हळदीचे पीक घेतले जाते. राज्यात सांगलीमध्ये हळदीचे मोठे मार्केट आहे. या ठिकाणच्या हळदीचा दर्जा चांगला असल्यामुळे येथून परदेशात मोठ्या प्रमाणात हळद निर्यात केली जाते. भारतात कोरोना फोफावण्याआधी दुबई आणि युरोपियन देशात हळदीची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली आहे. सध्या सांगलीतून रोज 200 टन हळद विक्री होत आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत पीक जास्त असल्यामुळे अद्याप दरवाढ झाली नसल्याची माहिती हळदीचे व्यापारी कमलेश जोशी यांनी दिली. हळदीच्या दर्जानुसार 70 ते 140 रुपये किलोपर्यंत हळद विकली जात आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून वाशीच्या मसाला मार्केटमध्येही हळदीच्या विक्रीत 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याची माहिती जोशी यांनी दिली. 

आपल्या भारतीय स्वयंपाक पद्धतीमध्ये जे वापरले जाणारे मसाले आहेत, ते एक प्रकारे औषधांचे काम करतात. त्यापैकी हळद एक आहे. हळद गुणकारी असून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करते. हळदीचे रोज सेवन केल्यास खोकला, त्वचारोग, सर्दीसारख्या संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवते. - भवानी स्वामीनाथन, आहारतज्ज्ञ, आकांक्षा डिझायर फॉर वेलनेस, नवी मुंबई.  

demand for turmeric exports increased due to pandemic corona virus read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com