मोठी बातमी : पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांचा अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

मोठी बातमी : पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांचा अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

नवी मुंबई  : पुण्यात मोटार ट्रान्स्पोर्ट विभागात पोलीस उप महानिरीक्षक पदावर कार्यरत असलेले निशीकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तीचे कुटुंबिय तणावाखाली आहे. त्यातच, पिडीत मुलीच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्याच्या चालकाने न्यायालयाच्या आवारात धमक्‍या दिल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडीलांनी केला आहे. दिनकर साळवे असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून साळवे हा पुर्वी निशिकांत मोरे यांच्या गाडीचा ड्रायव्हर होता. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, निशीकांत मोरे यांचा अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

खारघर येथे रहाणारे व पुणे येथे मोटर ट्रान्सपोर्ट विभागात कार्यरत असलेले पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे त्यांच्यावर त्यांच्या ओळखीतल्या अल्पवयीन मुलीने विनयभंगाचा आरोप केल्याने, तळोजा पोलिसांनी निशीकांत मोरे यांच्यावर विनयभंगासह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आपल्या विरोधात गुन्हा दाखल होताच निशीकांत मोरे हे फरार झाले असुन त्यांनी अटकपुर्व जामिन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. याचदरम्यान गेल्या सोमवारी मध्यरात्री या घटनेतील पिडीत मुलगी आपल्या घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. बेपत्ता होण्यापुर्वी पिडीत मुलीने चिठ्ठी लिहून त्यात निशीकांत मोरे यांच्यामुळे झालेल्या मानसिक त्रासातून आपण आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे तळोजा पोलिसांनी पिडीत मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तीचा शोध सुरु केला आहे. मात्र अद्याप पिडीत मुलगी सापडलेली नाही. त्यामुळे पोलीस अंत्यत धीम्या गतीने तपास करीत असल्याचा आरोप पिडीत मुलीच्या पालकांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्याच्या चालकाने देखील आपल्याला धमक्‍या दिल्याचा आरोप पिडीत मुलीच्या वडीलांनी केला आहे. मंगळवारी निशीकांत मोरे यांच्या अटकपुर्व जामीनावरील सुनावणी दरम्यान पिडीत मुलीचे वडील व भाऊ पनवेल न्यायालयात गेले होते. त्यावेळी निशिकांत मोरे यांच्या पत्नीसोबत दिनकर साळवे हा देखील न्यायालय परिसरात आला

मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल
त्यावेळी दिनकर साळवे याने, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाहनाचा चालक आहे, याचा विचार करुन तुम्ही पुढचे पाऊल उचला, अशा प्रकारे धमकी दिल्याचे पिडीत मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे. या प्रकारानंतर पिडीत मुलीच्या भावाने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे. दिनकार साळवे हा सध्या मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत आहे. मात्र गेल्या पाच-सहा दिवसापासून तो कामावर गेला नसल्याचे आढळुन आले आहे. दिनकर साळवे याच्याविरोधात आलेल्या या तक्रारीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

deputy superintendent of Police Nishikant Mores  bail before arrest rejected by court

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com