Inside Story - असा अडकला एजाज लकडावाला पोलिसांच्या जाळ्यात

Inside Story - असा अडकला एजाज लकडावाला पोलिसांच्या जाळ्यात

कुख्यात गुंड एजाज लकडावाला याला तब्बल 23 वर्षानंतर अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. एजाज विरोधात हत्या, खंडणी सारख्या 80 हून अधिक तक्रारी असून मुंबईत 25 गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच एजाजची मुलगी सोनिया अडवानी हिला अटक केली होती. तिच्या चौकशीतून एजाजचा थांगपत्ता लागला आहे.

अल्पवयीन असतानाच पहिला गुन्हा

जोगेश्वरीच्या अमृतनगरमध्ये राहणाऱ्या एजाजवर तो अल्पवयीन असतानाच पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. शाळेत असताना त्याने त्याच्या शिक्षिकेला मारहाण केली होती. त्यानंतर एजाज परिसरात छोट्या मोठ्या चोरी आणि मारामाऱ्या करू लागला. त्यावेळीच 'डी गँग'ची नजर त्याच्यावर पडली. पुढे राजनच्या सांगण्यावरून तो सुपाऱ्या घेऊ लागला. पायधुनी पोलिस ठाण्यात एजाजवर 2 हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यात तो अटकेत असताना. 1997 मध्ये त्याला नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आले होते. वैद्यकिय तपासणीसाठी त्याला मुंबईच्या जे.जे रुग्णालयात आणले असताना. पोलिसांना हुलकावणी देऊन त्याने पळ काढला होता.  

एजाज वारंवार आपली जागा बदलायचा

त्या दिवसापासून पोलिस त्याच्या मागावर होते. त्यामुळे एका ठिकाणी स्थिर न राहता. एजाज वारंवार आपली जागा बदलायचा. वेगवेगळ्या नावाने एजाज तब्बल 7 ते 8 देशात वावरत होता. 2000 मध्ये मुंबई पोलिसांनी कुख्यात गुंडांविरोधात रान उठवले असताना. 2006 मध्ये एजाजने त्याच्या कुटुंबियांना परदेशात हलवण्याचे ठरवले. बनावट कागदपञांच्या मदतीने तो त्याची पत्नी उमा थडानी, मुलगा आणि मुलीला परदेशात नेहण्याच्या प्रयत्नात होता. माञ पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडला. त्यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबावर 2006 मध्ये बनावट पासपोर्ट प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्याने त्याच्या पत्नीचे नाव उमा थडानी बदलून रेखा अडाणी हे नाव पासपोर्टवर नोंदवले होते.

छोटा राजन आणि दाऊद यांच्यातील ताणलेले संबंध 

१९९३ च्या स्फोटानंतर छोटा राजन आणि दाऊद यांच्यात संबंध ताणले गेले होते. त्यावेळी एजाज राजनसोबत वेगळा झाला होता. माञ डी कंपनीकडून वाढता धोका पाहता. त्याने राजनच्या परवानगीनेच स्वत:ची वेगळी टोळी बनवली. माञ तरी ही एजाज राजनसाठी अधून मधून काम करायचा. माञ पोलिसांनी त्याच्या टोळीतील महत्वाच्या म्होरक्यांची धरपकड केल्यानंतर मुंबईतील त्याचे वर्चस्व कमी झाले होते. त्यातच  फेब्रुवारी 2019 मध्ये खंडणी विरोधी पथकाने एजाजचा भाऊ अखिल युसूफ लकडावाला याला हाजीअली येथून अटक केली. 

एजाजची मुलगी भारतातून त्याला माहिती देत ​

अखिलच्या चौकशीनंतर मुंबईत वास्तव्यास असलेल्या एजाजच्या कुटुंबियांचा पोलिसांना थांगपत्ता लागला. तपासात एजाजची मुलगी भारतातून त्याला माहिती देत असायची. त्यानुसार लकडावाला यांची मुलगी सोनिया मनीषा अडवानी (लग्नानंतरचे नाव) हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावली होती. 27 डिसेंबर रोजी सोनिया आपल्या दीड वर्षाच्या मुला सोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नेपाळला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने तिला अटक करत तिचा ताबा मिळवला. तिच्या मोबाइल डिटेल्सनुसार ती एजाज लकडावाशी दररोज फोनवर बोलायची. लकडावाला परदेशात असताना. तो मुलीशी राञी 3 वा. बोलायचा. माञ भारतात आल्यानंतर भारतीय वेळेनुसार बोलू लागला. त्यावेळी पोलिसांनी एजाज भारतात आल्याचा अंदाज बांधला. मुलीच्या मोबाइलमध्ये मिळालेल्या विविध नंबरमधून तो बिहारच्या पटना येथे लपला असल्याची माहिती 27 डिसेंबर रोजी पोलिसांना मिळाली. त्यानुसार बिहार पोलिसांच्या मदतीने खंडणी विरोधाचे पोलिस त्याच्यावर लक्ष ठेवून होते.

विशेष म्हणजे भाऊ आणि मुलीच्या अटकेनंतर ही एजाज पैशांसाठी व्यावसायिकांना धमकावतच होता. 3 जानेवारी रोजी त्याने खारमधील एका व्यावसायिकाला धमकावले. पोलिसांनी त्या नंबरचा माग काढला आणि एजाजचे लोकशेन  पोलिसांना कळाले. पोलिस मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर एजाज पून्हा भारताबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानात मुंबई पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या.

exclusive how Ejaz Lakdawala caught by mumbai police special report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com