पेट्रोल पंपावरच करायचे 'तसले' धंदे, CCTV मध्ये झालं रेकॉर्ड..

पेट्रोल पंपावरच करायचे 'तसले' धंदे, CCTV मध्ये झालं रेकॉर्ड..

मुंबई, अंधेरी : इंधनाचे पैसे देण्यासाठी क्रेडिट अथवा डेबिट कार्ड वापरत असाल, तर सावधान. पेट्रोल पंपावर पैसे देण्यासाठी वापरलेल्या कार्डचे क्‍लोनिंग करून नागरिकांना लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीला पेट्रोल पंपावरील कामगारच मदत करत असल्याची शक्‍यता असून, त्या दिशेने तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अंधेरीतील एका नागरिकाने आपल्या बॅंक खात्यातून कोणीतरी पैसे काढल्याची तक्रार मुलुंड पोलिस ठाण्यात नोंदवली होती. गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजय जोशी यांना क्रेडिट, डेबिट कार्ड क्‍लोन करून नागरिकांना गंडा घालणारी टोळी अंधेरी-जोगेश्‍वरी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्या दिशेने गुन्हे शाखेचा तपास सुरू असल्याने मुलुंड येथील गुन्हाही त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. अशा कारवाया करणारी टोळी येणार असल्याची माहिती जोशी यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी या परिसरात बारीक लक्ष ठेवले. त्यांच्याकडे काही संशयितांचे सीसीटीव्ही चित्रीकरणही होते. अंधेरी-कुर्ला मार्गावरील एका बॅंकेच्या एटीएम सेंटरबाहेर पोलिस निरीक्षक दीपक सावंत यांच्या पथकाला एक संशयास्पद कार दिसली. त्या कारमधील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. या चौघांनी मुलुंड येथील एका नागरिकाच्या बॅंक कार्डचे क्‍लोनिंग केल्याचे कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. 

हे चौघेही मिरा रोड येथील रहिवासी आहेत. राजेश गौडा व उमेश लोकरे हे पेट्रोल पंपावरील एखाद्या कामगाराला हाताशी धरून मॅग्नेटिक कार्ड रिडरच्या मदतीने ग्राहकाचे कार्ड क्‍लोन करून एटीएममधून पैसे काढायचे. या चौघांनाही न्यायालयाने 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या टोळीकडून मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड रायटर, मॅग्नेटिक कार्ड रिडर, इंटरनेट डोंगल, आठ बॅंकांची कार्ड, चार मोबाईल आणि एक कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीच्या म्होरक्‍याला मध्य प्रदेशातील भोपाळ येथे 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. 

अशी होते लूट 

वाहनात इंधन भरल्यानंतर ग्राहक पेट्रोल पंपावरील कामगाराकडे क्रेडिट अथवा डेबिट कार्ड देतो. ग्राहकाची नजर चुकवून हे कार्ड बिलिंग मशिनबरोबरच कार्ड रिडरमध्ये स्कॅन केले जाते. त्यावेळी हा कामगार चोरून कार्डाचा "पिन' बघतो. या डेबिट अथवा क्रेडिट कार्डमधील डेटा चोरून नवे कार्ड बनवले जाते. या बनावट कार्डचा वापर करून ग्राहकाच्या बॅंक खात्यातून पैसे काढले जातात.  

mumbai police caught clan who were doing inappropriate things on petrol pump 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com