सत्ताकोंडी फोडण्यासाठी 'भागवत'पुराण ?

सत्ताकोंडी फोडण्यासाठी 'भागवत'पुराण ?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला नागपूरमध्ये संघ मुख्यालयात गेलेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नितीन गडकरी हे देखील यांच्या सोबत गेलेत. संघाच्या नेत्यांच्या भेटी गाठींचं सत्र आता महाराष्ट्रात पाहायला मिळतंय.

कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलीत अमित शह यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी नितीन गडकरी यांची फडणवीस यानी भेट घेतली आणि आज नागपुरात सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतलीये. या भेटीत राज्यातील राजकीय कोंडी फोडण्यासाठी चर्चा केली असल्याची माहिती आता समोर येतेय. 

शिवसेनेच्या हट्टामुळे भाजप शिवसेनेतील सत्तास्थापनेचा तिढा हा निर्माण झाल्याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ अधिकार्यांची भेट घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान दिल्लीकर भाजप श्रेष्ठींनी दिलेल्या सुचनेनुसार ही बैठक ठरली होती असंही समजतंय.  

आता देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्या भेटीनंतर सत्तेची नवीन काही समीकरणं समोर येतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी  मोदींचा पुढाकार ?

राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेतल्या माहिती सुत्रांनी दिलीय. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा य़ांच्यात उद्या संध्याकाळी बैठकीची शक्यता आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चेची शक्यता आहे. केंद्रीय केंद्रीय मंत्रिपरिषदेत मोदी आणि अमित शहा भेट होण्याची शक्यता आहे. 

WebTitle : devendra fadanavis met sarsanghachalak mohan bhagawat at RSS HQ in nagpur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com