esakal | "याच गतीने काम केलं तर कर्जमाफीला ४०० महिने लागतील..." - फडणवीस

बोलून बातमी शोधा

"याच गतीने काम केलं तर कर्जमाफीला ४०० महिने लागतील..." - फडणवीस
"याच गतीने काम केलं तर कर्जमाफीला ४०० महिने लागतील..." - फडणवीस
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाविकास आघाडीचं पाहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अशात आजचा अधिवेशनाचा दुसरा दिवस चांगलाच वादळी ठरलाय. विरोधी भाजपकडून शेतकरी कर्जमाफीवरून सभागृहात आणि सभागृहाबाहेर जोरदार निदर्शन करण्यात आली. महाविकास आघाडीकडून करण्यात येणारी शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय.  

मोठी बातमी - 'पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा दिला राजीनामा'; भाजपला मोठा शॉक...

काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस 

महाविकास आघाडीकडून मोठा गाजावाजा करत शेतकरी कर्जमाफी देण्यात आली. दोन महिन्यात केळवळ १५ हजार शेतकऱ्यांची यादी लावली, म्हणजे महिन्याला केवळ साडे सात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा रेकॉर्ड या सरकारने करतंय. याच गतीने कर्जमाफी द्यायचं ठरलं तर ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा दावा करणाऱ्या सरकारला या गतीने चारशे महिने लागतील. सध्या ज्या गावांमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या याद्या लागल्यात त्या गावातील २५ टक्के शेतकरी देखील यामध्ये कव्हर होत नाहीत. सभागृहात दिलेल्या माहितीप्रमाणे बुलडाण्यातील १८०० शेतकऱ्यांपैकी केवळ १९२ शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे या सरकारकडून शेतकऱ्यांची केवळ दिशाभूल केली जातेय. याचसोबत भाजपतर्फे सभागृहात महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. असं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

मोठी बातमी - शिवसेना म्हणतेय, फडणवीस तुम्ही कामाला लागा...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता आणि राज्यातील महिला भगिनींवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सभागृहाचं कामकाज संपूर्ण दिवसासाठी बंद पडलंय. 

याचसोबत महाराष्ट्रात भाजपकडून शेतकरी कर्जमाफीवरून राज्यातील तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरु आहे. या धरणं आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असा विश्वास विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला.

opposition leader devendra fadanavis targets mahavikas aaghadi and loan wavier on second day of budget session