cm devendra fadnavis
sakal
मुंबई: ‘‘अजित पवार हे आमच्या सरकारमध्ये होते. माझ्याशी त्यांचे व्यक्तिगतही खूप चांगले संबंध होते. ते सर्व गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. अजित पवार जर समजा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा करत असतील, तारीखही ठरली असेल तर ते मला सांगणार नाहीत का? किंबहुना एकत्रीकरणाची चर्चा भाजपशी करणार नाहीत का?, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. अशा वेळी राजकारण करणे मला योग्य वाटत नाही, नाही तर मी देखील अनेक गोष्टी सांगू शकतो पण ते मी करणार नाही असेही ते म्हणाले.