Devendra Fadnavis Bullet Ride : देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

Maharashtra CM Bullet to Vidhan Bhavan : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी बुलेटवरून विधानभवनात प्रवेश केला. त्यांच्या या अनोख्या पुढाकाराची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Devendra Fadnavis Bullet Ride vidhanbhavan

Devendra Fadnavis Bullet Ride vidhanbhavan

esakal

Updated on

Devendra Fadnavis fuel saving initiative : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार दिवसांपूर्वी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस )(Devendra Fadnavis) यांनी स्वतःपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. वाहनांचा मोठा ताफा बाजूला ठेवत मुख्यमंत्री थेट दुचाकीवरून विधानभवनात दाखल झाले.

मुख्यमंत्री फडणवीस हे आशिष शेलार यांच्यासोबत बुलेटवरून विधानभवनात पोहोचले. त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांचाही दुचाकी ताफा सोबत होता. इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करत अनोख्या पद्धतीने विधानभवनात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.

काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांना इंधन बचतीबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वतःपासून सुरुवात करत त्यांनी आदर्श घालून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनीही कालपासून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांकडून इंधन बचतीचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला जात असल्याने याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com