

Mumbai Local Automatic Door Closing Train
ESakal
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एक आनंदाची बातमी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने बुधवारी रात्री उशिरा घोषणा केली की, मुंबई लोकल ट्रेनच्या ताफ्यासाठी ऑटोमॅटिक डोअर क्लोजरिंग सिस्टमने सुसज्ज असलेल्या २३८ नवीन ट्रेन खरेदी केल्या जातील. १२० मेल-एक्सप्रेस ट्रेन आणि ३,२०० उपनगरीय लोकल ट्रेनची क्षमता वाढवण्यात येईल आणि सात उपनगरीय प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येईल.