Jan Suraksha Bill : मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात मांडलं 'जनसुरक्षा' विधेयक ; जाणून घ्या, यावेळी काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis present Jan Suraksha Bill : आता केवळ दोन तालुक्यातच माओवाद राहिला असूनही तोही लवकरच संपुष्टात येईल, असंही सांगितलं आहे.
CM Fadnavis
Maharashtra CM Palghar Promiseesakal
Updated on

What is the Jan Suraksha Bill? : राज्यातील अंतर्गत सुरक्षा अबाधित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज(गुरुवार) विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक मांडलं. यावेळी त्यांनी राज्यातून माओवाद हळूहळू पूर्णपणे संपुष्टात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जनसुरक्षा विधेयकासाठी तब्बल बारा हजार हरकती आणि सूचना देखील आल्याची माहिती यावेळी समोर आली आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी संयुक्त चिकित्सा समितीचेही आभार व्यक्त केले. सूचना आणि हरकतीनंतर या कायद्यात तीन महत्त्वाचे बदल केले गेले.

हे विधेयक मांडताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ हे गेल्या वर्षी डिसेंबरच्या अधिवेशनात सभागृहात मांडलं होतं. त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे. त्याचबरोबर या विधेयाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अफवा होत्या या अफवांना योग्य उत्तर मिळालं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं पाहिजे म्हणून आपण हे संयुक्त चिकित्सा समितीकडं पाठवण्याचा निर्णय घेतला.

हा कायदा आणण्याचे कारण काय? -

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ''आपल्याला माहिती आहे की देशात मागील काळात काही राज्य ही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा ज्याला आता असं म्हटलं जातय की कडवी डावी विचारसरणी. अशाप्रकारच्या विचाराने प्रेरित होवून, अनेक लोक हे सुरुवातीच्या काळात बंदुका हाती घेवून व्यवस्थेच्या विरुद्ध लढा. भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे, ती आम्हाल मान्य नाही. म्हणून आमचा हा लढा आहे, आम्हाला साम्यवादी अशाप्रकारची व्यवस्था उभी करायची आहे. अशाप्रकारच्या विचारातून या संघटना तयार झाल्या.''

CM Fadnavis
Congress Party Workers Clash : काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, कार्यकर्ता रक्तबंबाळ, तर माजी आमदार गंभीर जखमी!

तसेच, मागील काही वर्षांत केंद्र सरकार, विविध राज्य सरकारं या सगळ्यांनी मोठ्याप्रमाणात काम केल्यानंतर, आता हा जो बंदूक घेवून जो माओवाद आहे. हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे येतोय. महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे की, महाराष्ट्रात पूर्वी चार जिल्हे माओवादग्रस्त होते. आता केवळ दोन तालुक्यात आपल्याला सक्रीय माओवाद दिसतोय आणि पुढील वर्षभरात त्या ठिकाणीही माओवाद राहणार नाही, अशाप्रकारची आज अवस्था आहे. असंही फडणवीसांनी सांगितलं.

CM Fadnavis
Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

जनसुरक्षा कायदा काय आहे? -

सुरक्षा कायदा (PSA) हा एक अजामीनपात्र आणि प्रतिबंधात्मक कायदा आहे. या कायद्यानुसार, जर सरकारला वाटत असेल की एखादी व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे, तर त्या व्यक्तीला कोणत्याही आरोपाशिवाय ताबडतोब ताब्यात घेतले जाऊ शकते.

यावेळी फडणवीस सर्वात आधी संयुक्त चिकित्सा समितीचे आभार मानले आणि म्हटले की, संयुक्त चिकित्सा समितीमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समिती प्रमुख म्हणून चांगले काम केलं. तसेच, या समितीमध्ये जयंत पाटील, नाना पटोले, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, दिपक केसरकर, अनिल पाटील, मनिषा चौधरी, मंगेश कुडाळकर, अजय चौधरी, रणधीर सावरकर आदी विधासभा सदस्या आणि यांच्यासोबत विधानपरिषदेमधील सदस्य सतेज पाटील, विक्रम काळे, शशिकांत शिंदे, मनिषा कायंदे, सुनील शिंदे, उमा खापरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अमित गोरखे, अंबादास दानवे या सर्व सदस्यांनी या विधेयकावर संयुक्त चिकित्सा समितीमध्ये चांगलं काम केलं, त्यामुळे मी सर्वप्रथम समिती प्रमुख आणि सर्व समिती सद्सयांचे आभार मानतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com