
'ठोक के जवाब' देणार; फडणवीसांची आज मुंबईत सभा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या काल झालेल्या सभेमुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. कालच्या सभेतल्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. याच टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) सभा घेत आहेत.
हेही वाचा: 'राज'कीय लोचा ते फडणवीसांचं वजन; उद्धव ठाकरेंचं भाषण एका क्लिकवर..
भाजपाने मुंबईतल्या गोरेगाव भागात आज सभा आयोजित केली आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होणार आहे. मात्र ही सभा पूर्वनियोजित होती. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ही सभा आयोजित केली नसल्याची माहिती भाजपाच्या काही सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा: जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणावर देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत टीका केली होती. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असा इशाराच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. आपल्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले होते, "सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत, विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम...अरे छट..हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा."
Web Title: Devendra Fadnavis Mumbai Rally To Comment On Uddhav Thackeray Allegation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..