नाहीतर गुरं-ढोरं आणि पोरांसह 'मातोश्री'वर धडक देऊ...

नाहीतर गुरं-ढोरं आणि पोरांसह 'मातोश्री'वर धडक देऊ...

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारविरुद्ध भाजपचे आंदोलन सुरु आहे. त्यात आता धनगर समाजानंही ठाकरे सरकार विरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. जर येत्या १८ मार्चपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकारनं सोडवला नाही तर मातोश्रीच्या दारात उपोषण करू असं मल्हार आर्मीचे नेते सुरेश कांबळे यांनी म्हंटलंय.

धनगर आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या २७  संघटना यासाठी एकत्र आल्या आहेत. या सर्व संघटनांनी मल्हार आर्मी नावाची एक संघटना स्थापन केली आहे. जर मल्हार आर्मीच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मातोश्रीच्या समोर बायका-पोरांसह येऊन आमरण उपोषण करु असं कांबळे यांनी म्हंटलंय.

काय म्हणाले सुरेश कांबळे:
 
"याआधी युतीच्या सरकारमध्ये असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपुरात आले होते. त्यावेळी विठ्ठलाच्या साक्षीनं त्यांनी धनगर समाजाला  शब्द दिला होता की जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही,त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात भाजपवर दबावही टाकला होता.आता ते स्वत: मुख्यमंत्री आहेत त्यांनी आता तरी धनगर समाजाला आरक्षण द्यावं. जर आरक्षण दिलं नाही तर आम्ही सरकारच्या विरोधात जाऊ." असा धमकी वजा इशारा सुरेश कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

गुरं-ढोरं, शेळ्या मेंढ्यासहित उपोषण करू: 

येत्या १८ मार्चच्या आधी सरकारनं धनगर समाजाला आरक्षण द्यावं. नाहीतर १८ मार्चला आम्ही बायका, पोरं, गुरं-ढोरं, शेळ्या मेंढ्यासहित आमच्या संपूर्ण धनगर समाजाची वाद्य आणि पारंपारिक वेशभूषा करुन मातोश्रीसमोर उपोषणाला बसू. आमचं हे उपोषण आमरण उपोषण असेल. या उपोषणामधून जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार असतील." असं इशाराही सुरेश कांबळे यांनी दिला आहे. 

आता ठाकरे सरकार १८ मार्चच्या आधीपर्यंत धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवणार का हेच बघणं महत्वाचं असणार आहे.  

Dhanagar community will protest in front of Matoshri for reservation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com