कितीही वेळा चौकशी केली तरी काहीही सापडणार नाही - सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

मुंबई - महाविकास आघाडीविरोधात आणि महाविकास आघाडीने केलेल्या शेतकरी कर्जमाफीविरोधात भाजपकडून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धरणं आंदोलन करण्यात येतंय. भाजपचे लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रभरात तहसीलदार ऑफिससमोर कर्जमाफीविरोधात आंदोलन करतायत. तर मुंबईत आझाद मैदानावर भाजपकडून मोठं धरणं आंदोलन करण्यात येतंय. या धरणं आंदोलनात भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनी हजेरी लावलीये. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आशिष शेलार हे सर्व नेते उपस्थित होते. यावेळी सर्व बड्या नेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं.  

मोठी बातमी - घेणं ना देणं..! नागरिकांना बसतोय तीन हजारांचा भुर्दंड...     

यावेळी बोलताना महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर घणाघाती टीका केलीये. महाविकास आघाडीचं सरकार निष्क्रिय असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीकडून करण्यात आलेली कर्जमाफी फसवी असल्याचं मुनगंटीवार म्हणालेत. 'अब की बार बाप-बेटे की सरकार' या वाक्यांचा वापर देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केला. याचसोबत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकार हे स्थगिती सरकार असल्याचं म्हटलंय. भाजप सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना चौकशीसाठी सातत्याने स्थगिती दिली जातेय. अशात कितीही वेळा चौकशी केली तरी काहीही सापडणार नाही असं देखील मुनगंटीवार म्हणालेत.

मोठी बातमी - आणि सुप्रियाच्या माहेरीच पती पत्नीमध्ये सुरु झालं धाब.. धूब.. धाब.. धूब..

महाराष्ट्रातील महिला आणि भगिनींच्या सुरक्षिततेबद्दल देखील मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. महिलांवर अत्याचार करणारे नराधम मोकाट कसे? असा सवाल देखील मुनगंटीवारांनी उपस्थित केलाय. आझाद मैदानातील व्यासपीठावरून भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. 

ex finance minister sudhir mungantiwar targets maha vikas aaghadi govt over farmers loan wavier

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex finance minister sudhir mungantiwar targets maha vikas aaghadi govt over farmers loan wavier