
Anjali Damania Vs Dhananjay Munde : ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणी धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आणखी आक्रमक झाल्या असून उद्या याबाबत आपण नवा खुलासा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणी मुंडेंना आमदारकीचा राजीनामा द्यावाच लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे. यांसह इतर विविध मुद्द्यांवरही दमानिया यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.