धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार का ? जयंत पाटील यांनी गोष्टी केल्यात क्लियर

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार का ? जयंत पाटील यांनी गोष्टी केल्यात क्लियर

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याची भेट  घेतली. धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली आणि धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटील यांनी सविस्तर खुलासा केला. 

धनंजय मुंडे याना ब्लॅकमेल केलं जात होतं, त्याबाबत त्यांनी या आधी पोलिसात तक्रार दिलेली होती. मात्र पोलिसांनी निष्कर्ष काढल्यानंतर आपण अंतिम निष्कर्ष काढायला हवा, निष्कर्ष काढण्याची आपण कुणीही घाई करू नये. धनंजय मुंडे यांना एक महिला ब्लॅकमेल करण्याचं काम करतेय, याबाबत वांद्रे पोलिसांत मुंडे यांनी तक्रार दिलेली आहे. त्यामध्ये पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावीत एवढीच अपेक्षा होती. ती उचलली नाहीत म्हणून ते हायकोर्टात गेलेत. हायकोर्टात देखील त्यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे. आता याबाबत पोलिसांनी प्राथमिक चौकशी करावी. आणि मला खात्री आहे की याबाबतीत कोणत्याही प्रकारे, कुणीतरी महिला वाटेल ते आरोप करून राजकीय व्यक्तिमत्वाला बदनाम करत असेल तर त्याची दखल आपण घ्याल असा मला विश्वास आहे. याबाबत पोलिस योग्य ती माहिती घेतील. आम्ही याबाबत कोणताही हस्तक्षेवप करणार नाही. त्यामुळे आपण याबाबतीत कुणीही पोलिसांचा रिपोर्ट येईपर्यंत कुणीही घाई करू नये. 

आरोप गंभीर आहेत म्हणून आम्ही चर्चा करत आहोत. जी परिस्थिती आहे, त्याबाबत पोलिस माहिती घेतील आणि त्यानंतर योग्य ती पावलं टाकण्यात येतील. 

कुणीही कुणावर आरोप केल्यानंतर लगेच तातडीने त्याची शहनिशा न करता पक्षाने काही निर्णय घेणं हे अपेक्षित नाही. या प्रकरणात एखाद्या महिलेने शेवटच्या स्वरूपाचे आरोप जरी केले असले तरी तसे आरोप, तसं ब्लॅकमेलिंग, ताशा धमक्या धनंजय मुंडे यांना यापूर्वी दिल्या जात होत्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये आणि हायकोर्टात माहिती दिलेली आहे. याबाबत सर्व माहिती पोलिस एकत्रित करतील. आरोप गंभीर आहेत मात्र त्यासोबत जोडलेले फॅक्ट्स लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची कोणतीही चर्च झालेली नाही. 

dhanjay munde controversy jayant patil says let police file report and then we will take action

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com