कोरोना : धारावीमध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत अत्यंत धक्कादायक बाब समोर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

धारावीत कोरोनाचा कहर सुरूच आहे. येथे अजूनही कोरोना नियंत्रणात येत नाही. या भागात आतापर्यंत 1500 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई : धारावीत कोरोनाचा कहर सुरूच आहे. येथे अजूनही कोरोना नियंत्रणात येत नाही. या भागात आतापर्यंत 1500 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यात धारावीत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कामगारांपैकी 75 टक्के पालिकेच्या कामगारांचा समावेश असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

नक्की वाचा : कौतुकास्पद! दोन महिन्यात तब्बल 10 हजार नागरिकांची तपासणी करणारा योद्धा; वाचा सविस्तर

धारावीत पालिकेचे कामगार, आरोग्य खात्याचे कामगार, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. धारावीत घरोघरी जाऊन लोकांना मदत करीत आहेत. आरोग्य सेवा देत आहेत. आघाडीवर राहून काम करणाऱ्या या योध्याना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. कामगारांना कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या भागातील कामगारांपैकी 75 टक्के कामगारांना कोरोना झाल्याची माहिती उजेडात आल्याने आरोग्य खात्यापुढे चिंता निर्माण झाली आहे. 

महत्वाची बातमी : विद्यार्थ्यांनो...! परिक्षेबाबत मुंबई विद्यापीठाने घेतला महत्वपूर्ण निर्णय, वाचा

धारावीतील रोज रुग्णांची दुप्पटीने वाढणारी संख्या, गेल्या तीन दिवसांपासून कमी झाली आहे. ही दिलासादायक बाब असली तरी या भागात काम करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या गुरुवारी ४७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही घटत असल्याने दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या १,४२५ वर पोहोचली असून ५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाची बातमी : कोरोना झाल्यास पोलिसांवर तातडीने उपचार होणार, महाराष्ट्र कुटूंब आरोग्य योजनेत कोव्हिडचा समावेश

कामगार थकले
गुरुवारी आढळलेले रुग्ण मुस्लिम नगर , माटुंगा लेबर कॅम्प ,  इंदिरा नगर , लक्ष्मी चाळ , जनता सोसायटी, सर्वोदय सोसायटी, सोशल नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, काळा किल्ला,  कुंची कुरवे नगर, या परिसरातील आहेत. येथे काम करणारे पालिकेचे कामगार आणि आरोग्य खात्याचे कामगार थकले आहेत.

 

In Dharavi, in front of a very shocking matter about the employees working in the essential services


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Dharavi, in front of a very shocking matter about the employees working in the essential services, so many people are corona