

Shivsena Vs Congress Tension Escalates In Dharavi
Esakal
मुंबईत महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारावेळी पैसे वाटप केले जात असल्याचेही आरोप होत आहेत. काही ठिकाणी मारहाणीच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान आता धारावीत प्रचाराची वेळ संपल्यानंतरही प्रचार सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेसनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवल्यानं गदारोळ झालाय. रात्री साडे दहा वाजल्यानंतरही शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.