धारावीचा पुर्नविकास केंद्रामुळेच रखडला; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

महाविकास आघाडीचे सरकार कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्काची घरं बांधून देणार असल्याचेही ते म्हणाले.
धारावी पुनर्विकास प्रकल्प
धारावी पुनर्विकास प्रकल्पSakal

मुंबई : धारावीचा पुनर्विकास हा केंद्राच्या धोरणामुळे रखडला असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. धारावीचा (Dharavi) विकास झाला पाहिजे असे सांगत, मुख्यमंत्री म्हणाले की, धारावीचा विकास होऊ शकत नाही कारण, याबाबत केंद्रासोबत जी काही बोलणी सुरू आहे. यासाठी रेल्वेची (Railway Land) जी जमीन आहे त्यासाठीची जी रकक्म म्हणजेच जवळपास 800 कोटींची रक्कम देण्यात आली आहे. मात्र, पैसे देऊनही ती जमीन आपल्याला हस्तातरीत होत नाहीये. यावेळी त्यांनी सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्काची घरं बांधून देणार असल्याचेही आश्वासन दिले. ते विधानसभेत अर्थसंक्लपीय अधिवेशनात बोलत होते. (Uddhav Thackeray On Dharavi Redevelopment )

केंद्राच्या ज्या जागा मुंबईमध्ये आहेत त्या जागांचंसुद्धा काय केलं पाहिजे याचा नुसता विचार करून चालणार नाही. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून त्यावर एकदा काय तो तोडगा काढणे आवश्यक असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. आपण मुंबईच्या जनतेसाठी आपण जो काही प्रश्न मांडला त्याचा आपल्याला आनंद होत असल्याचे सांगत, आमदारांसाठी कायमस्वरुपी 300 घर बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्प
महापालिकेत घोटाळेच घोटाळे! मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचं काम सुरु: फडणवीस

"महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) अर्थमंत्र्यांनी मांडला. देशाच्या आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबईच रुप कसं असेल? हे दर्शवणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबई अन्न वस्त्र मिळतं पण पाठ टेकायला घर नसतं. त्यामुळं सर्व वर्गातील लोकांच्या घरांसाठी सरकारनं विचार केला आहे. मुंबईचा यापूर्वी गांभीर्यानं कोणी विचार केला नव्हता. मुंबईचा विचार केला गेला पण सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणूनच केला गेला. हे सोन्याचं अंड घेऊन जातात, पण त्या कोंबडीची देखभाल कोण करणार?"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com