भाजपच्या मुंबई अध्यक्षांना पाहिलंत का? राजकीय वर्तुळात आहे "ही" चर्चा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुंबई : भाजपचे माजी मंत्री ऍड.आशिष शेलार आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधाकांवर तुटून पडलेले असताना मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा कोठेच दिसत नाही.त्यामुळे हे मुंबई अध्यक्ष आहेत कोठे असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. 

हेही वाचा : फुटबॉल खेळता खेळता पाणी पिऊन आला, चक्कर आला आणि निर्भय तिथेच कोसळला

मुंबई : भाजपचे माजी मंत्री ऍड.आशिष शेलार आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधाकांवर तुटून पडलेले असताना मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा कोठेच दिसत नाही.त्यामुळे हे मुंबई अध्यक्ष आहेत कोठे असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. 

हेही वाचा : फुटबॉल खेळता खेळता पाणी पिऊन आला, चक्कर आला आणि निर्भय तिथेच कोसळला

तान्हाजी हा सिनेमा कर मुक्त करा ही मागणी लोढा यांनी केली आहे. त्यापुर्वी गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात फ्रि काश्‍मिरच्या बॅनर विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनात ते दिसले होते. मात्र,फ्रि काश्‍मिरचा मुद्दा किरीट सोमय्या यांनी चर्चेत आणला होता. त्यांनीच पाठपुरावा केल्यानंतर त्या मुलीला पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा :  मुंबईकरांनोे त्या आनंदी दिवसांसाठी व्हा सज्ज

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल वादग्रस्त पोस्ट समाजमाध्यमांवर लिहीणाऱ्या व्यक्तीचे शिवसैनिकांनी मुंडन केले होते. त्या वादातही सोमय्या यांनी पुढाकार घेऊन संबंधीत शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करुन घेतला होता. तर, आजही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारला केलेल्या मारहाणीचा मुद्दाही सोमय्या यांनी उचलून धरला आहे. तर, सुधारीत नागरीत्व कायद्याबाबतच्या अभियानात सहभागी झालेल्या शाळेला नोटीस पाठवल्याच्या विरोधात सोमय्याही पुढे आहे. तर, आमदार शेलारही प्रत्येक मुद्दयावरुन महापालिका आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आहेत.शेलार आणि सोमय्या यांनी थेट ठाकरे कुटूंबालाच आव्हान देण्यास सुरवात केली आहे.ऍड.शेलार यांनी मुंबई विद्यापिठातील आंदोलनावरुन कॉंग्रेसला आव्हान दिले आहे. तर, महापालिकेतील रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवसेनेला भिडले आहेत. 

हे वाचलंत का? सारथीचा कारभारी बदलला जेपी गुप्ता यांची उचलबांगडी

ऍड.शेलार आणि सोमय्या यांनी एकाच वेळी शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला आव्हान देण्यास सुरवात केली आहे.या सगळ्या परीस्थीतीत मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा कोठेही दिसत नाही.लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यवसायिक आहेत.ते नेहमीच सत्ताधाऱ्यां बरोबर सलोख्याचे संबंध ठेवून असतात.अशी त्यांची ख्याती मानली जाते.त्यामुळेच हे ते पडद्या आड असल्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. 

शिवसेनेशी सलोख्याचे संबंध 
नेहमीच शिवसेनेशी सलोख्याचे संबंध राखून आहेत.अगदी लोकसभा निवडणुकीतही त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी मलबार हिल मतदार संघाची जबाबदारी एकट्याने पेलली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did you see the BJP president of Mumbai?