'सारथी'चा कारभारी बदलला, जेपी गुप्ता यांची उचलबांगडी..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुंबई : सारथी संस्थेच्या कारभारातून प्रधान सचिव जेपी गुप्ता यांची उचलबांगडी करण्यात आली असून 'सारंथी'चा कारभार मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सत्ता बदलानंतर जेपी गुप्ता यांनी 'सारथी'च्या स्वायत्ततेवर गदा आणली होती. त्यामुळे  राज्यभरातील मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती.  सरकारला अंधारात ठेवून प्रधान सचिव निर्णय घेत असल्याने त्यांच्या विरोधात आंदोलने देखील झाली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर जेपी गुप्ता यांची राज्य सरकारने उचलबांगडी केली असून सारथीचा कारभार आता किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 

मोठी बातमी - मंगेशकर कुटुंबाची फडणवीसांवर नाराजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले..

मराठा कुणबी मराठा समाजाच्या आर्थिक,  सामाजिक व शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी सारथी या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली होती.  राज्य सरकारच्या अनुदानावर चालणाऱ्या सारथी ला सरकारने कंपनी कायद्या अंतर्गत स्वायत्तता दिली होती. मात्र राज्यातील सरकार बदलले आणि नवीन सरकार स्थापन होण्याअगोदरच प्रधान सचिवांनी सारथी च्या व्यवहारासंदर्भात आक्षेप नोंदवून या संस्थेची स्वायत्तता मंत्रालयाच्या अधिकारात आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले.

मोठी बातमी -  जाऊदे यावर्षी भाड्याच्या घरात राहू, पुढच्या वर्षी पाहू..

बार्टी या संस्थेच्या धर्तीवर 'सारथी'ची स्थापना झालेली असतानाही दोन्ही संस्थांच्या बाबतीत वेगळे धोरण मंत्रालयातील प्रधान सचिवांनी स्वीकारले होते. 'सारथी'मध्ये अनियमितता झाल्याचा ठपका देखील त्यांनी ठेवला होता. याचेच कारण पुढे करत सारथी ची स्वायत्तता  मंत्रालयाच्या अधिकारात आणण्याचा निर्णय प्रधान सचिवांनी घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात तीव्र निदर्शने आणि आंदोलने झाल्यानंतर सारथीची स्वायतत्ता कायम ठेवण्याचा निर्धार राज्य सरकारने व्यक्त केला.

Photo - उदयन राजेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं थेट उत्तर, मुंबईत लागले पोस्टर्स..

दरम्यान जेपी गुप्ता यांना सारथीच्या कारभारातून दूर करण्याची ग्वाही देखील राज्य सरकारच्या वतीने मंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांना दिली होती. त्यानुसार जेपी गुप्ता यांना सारथी च्या कारभारातून दूर करण्यात आले असून त्याऐवजी आता किशोर राजे निंबाळकर हे सारथी चे प्रशासकीय कारभारी म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान 'सारथी'मध्ये आर्थिक अनियमितता झाली असेल तर त्याची देखील चौकशी किशोर राजे निंबाळकर करणार आहेत. सारथी च्या सर्व व्यवहारांचा अहवाल ते राज्य सरकारला सादर करतील. 

kishor raje nimbalkar is now appointed as principal secretory of sarathi 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kishor raje nimbalkar is now appointed as principal secretory of sarathi