esakal | दिघा रेल्वे स्थानकांची तारीख पे तारीख
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

दिघा रेल्वे स्थानकांची तारीख पे तारीख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे व ऐरोली रेल्वे स्थानकांमध्ये दिघा रेल्वे स्थानकाचे काम एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) माध्यमातून आणि रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारांकडून करण्यात येत आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मार्च २०२० मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.

"नुकतीचे खासदार राजन विचारे यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिघा रेल्वे स्थानक कधीपर्यंत साकारण्यात येईल असा प्रश्न उपस्थित केला असता एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी २०२२ मध्ये काम पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले. दिघा रेल्वे स्थानकांच्या कामाची कुर्मगती पाहता, काम पूर्ण होण्यासाठी तारीख पे तारीख मिळत आहे. दिघा रेल्वे स्थानकांचे कामाचे भूमिपूजन डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आले. त्यानंतर तब्बल १४ महिन्यांनी, ७ मे २०१८ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. १११ कोटी रुपये खर्च करून उभ्या करण्यात वेणाऱ्या दिघा रेल्वे स्थानकांचे कामात झाडे, भूमिगत वीजवाहिन्या, महानगर गॅसवाहिन्या यांचा अडथळा आला.

हेही वाचा: UPSC Result: आसिम खान ऊर्दू माध्यमातून 'देशात' प्रथम

संथगतीमुळे विलंब दिघा रेल्वे स्थानकांचे संथगतीने सुरू असलेल्या कामाबाबत राजन विचारे यांनी एमआरव्हीसीच्या अधिकांऱ्यावर संताप व्यक्त केला. आता २०२२ मध्ये काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आल्याने प्रवाशांना आणखी वर्षभर दिघा रेल्वे स्थानकांची वाट पहावी लागणार.

loading image
go to top