Vidhan Sabha 2019 : दिपाली सय्यद यांचा प्रचार होतोय सोफीया जहाॅगिर सय्यद म्हणून !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादीचे कळवा मुंब्रा येथील विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेने अभिनेत्री दिपाली सय्यद यांना रिंगणात उतरविले आहे. ठाण्यातील कोणीही उमेदवार मिळाला नसल्याने शिवसेनेला या मतदारसंघात उमेदवार आयात करावा लागला आहे.

ठाणे :  राष्ट्रवादीचे कळवा मुंब्रा येथील विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेने अभिनेत्री दिपाली सय्यद यांना रिंगणात उतरविले आहे. ठाण्यातील कोणीही उमेदवार मिळाला नसल्याने शिवसेनेला या मतदारसंघात उमेदवार आयात करावा लागला आहे.

विशेष म्हणजे दिपाली सय्यद यांचा प्रचार करताना कळव्यात दिपाली सय्यद म्हणून तर मुंब्रा येथे सोफीया जहाॅगिर सय्यद म्हणून त्यांचा प्रचार होत आहे. मुंब्रा हा परिसर मुस्लीम बहुल परीसर म्हणून ओळखला जातो. नव्वद टक्के मतदार या परिसरात मुस्लीम आहेत. त्यामूळे येथे मुस्लीम मतदारांनी कौल दिलेला उमेदवार या मतदारसंघातून निवडून येत असतो. या मतदारसंघातील मुस्लीम मतांची विभागणी होऊ नये यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीच खबरदारी घेतली आहे. 

शिवसेनेकडून दिपाली सय्यद यांना जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात उमेदवारी

एआयएमआयएमच्या उमेदवाराची उमेदवारी या मतदारसंघातून जाहीर झाल्यानंतर ही उमेदवारी पक्षाच्या वतीने मागे घेण्यात आली आहे. त्यामूळे या मतदारसंघात थेट दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंब्रा येथील मतदान जास्तीत जास्त खेचण्यासाठी आता शिवसेनेने व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. अभिनेत्री दिपाली भोसले यांना लग्नानंतर दिपाली सय्यद झालेल्य आहेत. अशावेळी कळवा परिसरात मराठी बहुल परिसरात त्यांचा दिपाली सय्यद याच नावाने प्रचार केला जात आहे.

दिपाली सय्यदसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गायले 'हे' गाणे

तर त्याउलट मुंब्रा येथे मात्र त्यांच्या सासरच्या सोफीया जहाॅगिर सय्यद या नावाने प्रचार केला जात आहे. मुस्लीम समाजाला आपल्या समाजातील कोणी उभा असल्याची मानसिकता होण्यासाठी शिवसेनेकडून ही खेळी खेळली जात आहे. त्याला मुस्लीम समाजाकडून कितपत प्रतिसाद मिळणार हे एकवीस ऑक्टोबरच्या मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dipali Sayyad is campaigning in Mumbra as Sofia Jahangir Sayyad