
Nhava Sheva Port Pakistani Goods Seize
ESakal
महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) महाराष्ट्रातील मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर २८ कंटेनर जप्त केले आहेत. ज्यात ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी मूळचे सौंदर्यप्रसाधने आणि ड्राय डेट भरलेले होते. त्यांची किंमत सुमारे १२ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, केंद्र सरकारने २ मे २०२५ पासून पाकिस्तानी मूळच्या वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर पूर्णपणे बंदी घातली होती.