Mumbai Water Supply: नवी मुंबईत दूषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पालिकेविरोधात मनसे आक्रमक
Navi mumbai: पावसाळा सुरु होताच नवी मुंबईतील अनेक ठिकाणी दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पालिकेकडे याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
तुर्भे : पावसाळा सुरु होताच नवी मुंबईतील अनेक ठिकाणी नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत नागरिकांना उलट्या, जुलाब, दुर्गंधीयुक्त पाण्याचा वास सहन करावा लागत आहे.