esakal | सुशांत आत्महत्या प्रकरणातील व्हॉट्सअप चॅटचा सोर्स जाहीर करा; उच्च न्यायालयात अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांत आत्महत्या प्रकरणातील व्हॉट्सअप चॅटचा सोर्स जाहीर करा; उच्च न्यायालयात अर्ज

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मिडियामध्ये लिक झालेले कथित व्हॉट्सअप चॅट आणि साक्षीदारांचे जबाबाचा सोर्स जाहीर करावा

सुशांत आत्महत्या प्रकरणातील व्हॉट्सअप चॅटचा सोर्स जाहीर करा; उच्च न्यायालयात अर्ज

sakal_logo
By
सुनिता महामुणकर

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मिडियामध्ये लिक झालेले कथित व्हॉट्सअप चॅट आणि साक्षीदारांचे जबाबाचा सोर्स जाहीर करावा, अशी मागणी करणारा अर्ज एका निर्मात्याने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

मुंबईतील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कोविड -19 मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

सुशांतच्या आत्महत्येबाबत सुरु असलेल्या मिडिया ट्रायल विरोधात निर्माता निलेश नवलखा यांनी जनहित याचिका यापूर्वी केली आहे. यावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामध्ये आता नवलखा यांनी अर्ज केला आहे. या प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब आणि व्हॉट्सअप चॅट सर्रासपणे मिडियावर विशेषतः इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनलवर प्रदर्शित होत आहेत. तपास यंत्रणा सीबीआयने या चैटची माहिती दिली नाही, असा दावा न्यायालयात केला आहे. त्यामुळे तपासाला प्रभावित करणारी ही संवेदनशील आणि तपासाचा महत्त्वाचा भाग असलेली माहिती कोणी दिली याचा तपशील जाहीर करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

पुन्हा फेरीवाला धोरणाचं सर्वेक्षण करणार, राज्य सरकारचा निर्णय

तपास यंत्रणेतील संबंधित व्यक्तींवर अशी माहिती लिक केल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशीमार्फत कारवाई करावी आणि संबंधित न्यूज चॅनलवरही कारवाई करावी, अशी मागणी नवलखा यांनी केली आहे. चॅटमधून मोजका तपशील जगजाहीर करुन संबंधित व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मिडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकार का निश्चित करत नाही, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला आहे.

Disclose source of WhatsApp chat in Sushant case

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )