ST Bus: एसटीला फायदा! डिझेल इंधनावरील सवलतीत वाढ; कधीपासून होणार लागू?

MSRTC: इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील सवलत दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीला फायदा होणार आहे.
discount Increase on ST diesel fuel
discount Increase on ST diesel fuelESakal
Updated on

मुंबई : येत्या १ ऑगस्ट पासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरात प्रति लिटर ३० पैशाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसाला सरासरी तीन लाख २३ हजार रुपये याप्रमाणे वर्षाला अंदाजे ११ कोटी ८० लाख रुपये इतकी बचत होणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दाखवलेला व्यवसायिक दृष्टिकोन आणि योग्य वेळी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे एसटी महामंडळाची दरवर्षी तब्बल १२ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com