भिवंडी शहर कॉंग्रेस अध्यक्षपदावरून वाद; नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत 

शरद भसाळे
Tuesday, 27 October 2020

भिवंडी शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शोएब खान यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करून प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्यामुळे भिवंडीत नाराजीचे सूर उमटत असून गटबाजी उफाळून आली आहे. भिवंडी पालिकेच्या नगरसेवकांसह पदाधिकारी यांनी रशीद ताहीर मोमीन यांच्या नियुक्तीला विरोध करीत राजीनामा देण्याचे पत्र प्रदेश कॉंग्रेस कार्यालयास पाठवले आहे.

भिवंडी ः भिवंडी शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शोएब खान यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करून प्रभारी अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्यामुळे भिवंडीत नाराजीचे सूर उमटत असून गटबाजी उफाळून आली आहे. भिवंडी पालिकेच्या नगरसेवकांसह पदाधिकारी यांनी रशीद ताहीर मोमीन यांच्या नियुक्तीला विरोध करीत राजीनामा देण्याचे पत्र प्रदेश कॉंग्रेस कार्यालयास पाठवून बंड पुकारल्याचे संकेत दिले आहेत. 

डॉक्‍टरांच्या निस्वार्थ सेवेची जाणीव हवी; मारहाण करणाऱ्यास एक लाखाचा दंड 

भिवंडी शहरात कॉंग्रेस मजबूत करण्यात शोएब गुड्डू खान सिंहाचा वाटा असून त्यांना पदावरून दूर करणे चुकीचे आहे, असे मत कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक फराज बाहुउदीन, हालीम अन्सारी, अरुण राऊत यांच्यासह अन्य 14 नगरसेवकांनी व्यक्त केले. नवीन अध्यक्ष नेमताना पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक यांना विश्वासात घेणे आवश्‍यक आहे; मात्र प्रदेश कॉंग्रेस नेत्यांनी परस्पर नियुक्ती केली आहे.

नैना प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामावर कारवाई नाही; सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची ग्वाही

ही नेमणूक ही चुकीची असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी यांनी केला आहे. रशीद ताहीर यांच्या नियुक्तीचा फेरविचार न केल्यास सर्व नगरसेवक कॉंग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा नगरसेवकांचा बैठकीत नगरसेवक फराज बहाउद्दीन यांनी केली. या वेळी कॉंग्रेस गटनेता हलीम अन्सारी, नगरसेवक अरुण राऊत, वसीम अन्सारीसह 14 उपस्थित होते. 

Dispute over Bhiwandi city Congress post 

(संपादन ः रोशन)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute over Bhiwandi city Congress post