esakal | टोल दरवाढीमुळे टोलनाक्‍यांवर वाद, ठाण्यात वाहतूक कोंडीत भर
sakal

बोलून बातमी शोधा

expressway toll

पूर्वद्रुतगती महामार्गावर आधीच मेट्रोची कामे, कोपरी रेल्वे पुलाचे बांधकाम आदींमुळे वाहतूक कोंडी होत असते. त्यातच आता टोल दरवाढ केल्याने वाहनचालकांमध्ये रोष पसरला आहे.

टोल दरवाढीमुळे टोलनाक्‍यांवर वाद, ठाण्यात वाहतूक कोंडीत भर

sakal_logo
By
दिपक शेलार

ठाणे : कोरोनामुळे नोकरी-व्यवसायाला घरघर लागली असताना एकीकडे 1 ऑक्‍टोबरपासून टोलदरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे या टोल दरवाढीची अनेक वाहनचालकांना कल्पनाच नसल्याने टोलनाक्‍यांवर वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. टोल दरवाढीमुळे सकाळ-संध्याकाळी पूर्वद्रुतगती महामार्गासह ठाण्यातही प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 

महत्त्वाची बातमी : "योगीजी एसआयटी चा खेळ पुरे करा"; हाथरस पोलिस कारवाईवर मुंबई काँग्रेसची तीव्र टीका

पूर्वद्रुतगती महामार्गावर आधीच मेट्रोची कामे, कोपरी रेल्वे पुलाचे बांधकाम आदींमुळे वाहतूक कोंडी होत असते. त्यातच आता टोल दरवाढ केल्याने वाहनचालकांमध्ये रोष पसरला आहे. टोल वसुली करणारे कर्मचारी आणि वाहनचालक यांच्यात टोल दरावरून खटके उडत असल्याने ऐन सकाळच्या वेळेत, तसेच सायंकाळी परतीच्या वेळांमध्ये टोल नाक्‍यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही यामुळे कोलमडून पडत आहे.

महत्त्वाची बातमी : लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी बनवून द्यायचा बनावट QR कोड पास, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ठाणे जिल्ह्यातून मुंबईत जाणारे अनेक जण दररोज दुचाकी, तसेच अन्य वाहनाने मुंबईत ये-जा करतात. त्यातच बेस्ट व एसटी बसेस अधिक संख्येने रस्त्यावर धावत असल्याने पूर्वद्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत, तर सायंकाळपासून रात्री साडेआठपर्यंत टोल नाक्‍यांवर रांगा लागल्याचे चित्र होते. 

महत्त्वाची बातमी : मुंबईतील नायर रुग्णालयात 19 जणांना दिला गेला कोविशील्ड लसीचा डोस

टोलनाक्यावर वाद -
मुंबई महानगरीत 55 उड्डाणपूल उभारणीचा खर्च 25 वर्षे वसूल करण्यासाठी मुंबईच्या वेशीवर टोलनाके उभारण्यात आले. राज्य रस्ते विकास महामंडळासोबत (एमएसआरडीसी) झालेल्या करारानुसार दर तीन वर्षांनी या टोलदरांमध्ये वाढ होत असते. त्यामुळे गुरुवारी, 1 ऑक्‍टोबरपासून टोल दरवाढ करण्यात आली; परंतु अनेक वाहनचालकांना या दरवाढीची माहिती नसल्याने टोलनाक्‍यांवर वाद उद्भवत आहेत. 

(संपादन : वैभव गाटे)

dispute over toll plazas due to toll hike adding to traffic congestion in thane