विघ्नहर्त्याच्या मूर्तिकारांवर लॉकडाऊनचे विघ्न; कारागीर, मजुरांची उपासमार

ganpati
ganpati

तुर्भे : सध्या लॉकडाऊनचा आर्थिक फटका शहरातील बाप्पाची मूर्ती घडविणाऱ्या कारखान्यांना बसला आहे .त्यामुळे मूर्तिकार व त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शहारातील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह हा गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामावर अवलंबून असतो. दरवर्षी एप्रिल व मे महिन्यापासून मूर्तिकार बाप्पाची मूर्ती घडवण्याच्या कामाला लागतात. त्यात घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या मागण्या आतापासूनच घेतल्या जातात. मात्र, यंदा एप्रिल महिना संपत आला, तरी मूर्ती घडवण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध नसल्याने कारागीर लॉकडाऊन संपण्याची वाट बघत आहेत. 

कारखान्यासाठी लागणारी जागा व लागणारा कच्चा माल (माती, प्लास्टर, काथा, रंग) आणण्यासाठी पेण, मुंबई, गुजरात आदी ठिकाणी जावे लागते. तर काही मूर्तिकार हे पेणमधून मूर्ती आणून येथे रंगकाम पूर्ण करतात. मात्र, आता या परिस्थितीत जाता येत नाही किंवा माल मागवताही येत नाही. परिणामी, या वर्षी गणेशमूर्तींची कमतरता निर्माण होण्याची शक्यता मूर्तिकार व्यक्त करू लागले आहेत.

शाड़ू माती उपलब्ध व्हावी
सध्या राज्य सरकारने काही सेवांमध्ये शिथिलता आणत उद्योग व अन्य बाबीत सेवा सुरू केली आहे. भांडी आणि मूर्ती बनवणे हे उपजिविकेचे साधन असलेल्या कुंभार समाजाला गणेशमूर्तींसाठी शाडू माती उपलब्ध व्हावी, तसेच कच्चा माल किंवा इतर साहित्य आणण्यासाठी परवानगी द्यावी, याबाबत नवी मुंबईतील मूर्तिकार संघटनेच्या माध्यमातून मनपा प्रशासन व पोलिस आयुक्तांना पत्रव्यवहार केला जाणार आहे. 

नवी मुंबईत मूर्ती बनवणारे 

  • 50 ते 60 कारखाने
  • स्टॉलवर विकणारे 80 ते 90 व्यावसायिक

दरवर्षी एप्रिलपासूनच गणेशमूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. मात्र, यंदा कच्चा माल नसल्याने आम्हाला व कारागिरांना बसून राहावे लागत आहे. मनपा व पोलिस प्रशासनाने किमान कच्चा माल आणण्यासाठी परवानगी द्यावी, जेणेकरून वेळेत मूर्ती तयार होतील. घडविण्याची कामे पूर्ण होतील.
- संतोष चौलकर, विक्रांत कला निकेतन व नवी मुंबई गणेशमूर्ती संघटना अध्यक्ष

Disruption of lockdown on Ganesh sculptors Work stalled due to non-availability of raw material

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com