esakal | बाप्पाच्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बाप्पाच्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनोर : बोईसर (Boisar) रेल्वे स्थानक (Railway Station) आणि औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या नवापूर (Navapur) रोडची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. औद्योगिक विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Department of Public Works) भांडणात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास विलंब होत असल्याने अपघातांची (Accident) शक्यता निर्माण झाली आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाला काही दिवसांचा अवधी असताना खड्ड्यांमुळे विघ्न निर्माण होऊ नये यासाठी रस्त्यावरील (Road) खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी जोर धरत आहे.

नवापूर नाका ते टाकी नाक्यापर्यंतच्या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मधुर हॉटेलपासून अवधनगर ते टाकी नाक्यापर्यंत मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. रेल्वे स्थानक आणि औद्योगिक वसाहतीला जोडणारा मुख्य रस्ता, तसेच या भागात मोठी लोकवस्ती असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला असलेली गटारे तुंबल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाळा सुरू झाल्यानंतर लगेच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून रस्ता दुरुस्ती केली जात नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आंदोलन करण्यात आले होते. आश्वासन देऊनही गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत.

हेही वाचा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट मंदिराचा टाळा उघडून केली पूजा

नवापूर रस्ता औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे दुरुस्ती त्यांनी केली पाहिजे.

- सचिन धात्रक, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

औद्योगिक विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. दोन दिवसांत रस्ता दुरुस्ती करावी, अन्यथा औद्योगिक वसाहतीमध्ये येणारी अवजड वाहने रोखून धरण्यात येतील.

- समीर मोरे, उपजिल्हाध्यक्ष, मनसे

loading image
go to top