esakal | गुणवत्ता शिक्षक व कोविड योद्धा पुरस्कारांचे सफाळे येथे वितरण
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

गुणवत्ता शिक्षक व कोविड योद्धा पुरस्कारांचे सफाळे येथे वितरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : लायन्स क्लब (Lions Club) सफाळेतर्फे शिक्षक दिनाच्या (Teachers Day) निमित्ताने आदर्श शिक्षिका (Ideal teacher) दिवंगत प्रणिता प्रवीण (Pranita Praveen Patil) पाटील स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंत शिक्षक पुरस्कार व कोविड योद्धा पुरस्कार वितरण समारंभ सफाळे येथील देवभूमी सभागृहात पार पडला.

या वेळी पालघर तालुक्यातील सहा प्राथमिक आणि सहा माध्यमिक अशा १२ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोनाच्या महाआपत्तीमध्ये अविरतपणे जनसामान्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, पोलिस, परिचारिका, आशा परिचारिका अशा एकूण १७ जणांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सोहळ्याचे प्रमुख अतिथी लायन्स क्लबचे जिल्हा अध्यक्ष डॉ. ख्वाजा मुदस्सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की आई मुलाला जन्म देते, तर शिक्षक त्याला जीवन देतात. समाजातील शिक्षकांची भूमिका ही नेहमीच प्रेरणादायी आणि दिशादर्शक राहिली आहे. कोरोनाच्या महाआपत्तीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता जनसामान्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, पोलिस, नर्सेस, आशा सेविकांचासुद्धा सन्मान केल्याने निश्चितच त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा प्राप्त होईल. या वेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत व सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे यांची भाषणे झाली.

हेही वाचा: जागतिक स्पर्धेत पुरस्कार मिळविणाऱ्या युवकांचा गौरव करणार - नवाब मलिक

या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब सफाळेचे अध्यक्ष नितीन वर्तक होते. क्लबचे सचिव प्रमोद पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

loading image
go to top