Diva News : विविध आरक्षणा विरोधात लढा तीव्र करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

ठाणे महापालिकेने आगासन येथील भूखंडांवर दिवेकरांसाठी विविध सुविधांचे आरक्षण टाकले असून, यामध्ये विविध आरक्षण टाकण्यात आली आहेत.
Diva Villagers
Diva Villagerssakal

दिवा - दिव्यातील आगासन गावात ठाणे महानगरपालिकेने टाकलेल्या 13 हेक्टर जमिनीवर विविध आरक्षणा विरोधात आगासन गाव संघर्ष समितीच्या वतीने रविवारी संध्याकाळी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत आगासन ग्रामस्थांनी एकत्रित येऊन आरक्षणाविरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार केला.

ठाणे महापालिकेने आगासन येथील भूखंडांवर दिवेकरांसाठी विविध सुविधांचे आरक्षण टाकले असून यामध्ये प्रभाग समिती कार्यालय, पोलीस स्टेशन,अग्निशमन दलाचे कार्यालय, रुग्णालय, गार्डन, शाळा यासारखी विविध आरक्षण टाकण्यात आली आहेत.

नुकतेच ठाणे महानगरपालिका प्रशासनाने आगासन गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण केले. ग्रामस्थांचा विरोध असताना जबरदस्तीने झालेल्या सर्वेक्षणामुळे आगासन गावामधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. संपूर्ण दिवा शहरातील विविध सुविधांची आरक्षणे एकाच जागी का? असा प्रश्न आगासन गावातील शेतकऱ्यांनी, स्थानिकांनी विचारला आहे.

आगासन गावातील ग्रामस्थांनी आपल्या जमिनी अनेक वर्ष जोपासल्या त्या मोकळ्या ठेवल्या त्या ठिकाणी ते शेती करतात, त्या ठिकाणी त्यांनी बांधकाम केली नाहीत, म्हणून त्यांनाही शिक्षा दिली जाते का? असा प्रश्न यावेळी सभेला संबोधित करताना रोहिदास मुंडे यांनी उपस्थित केला. या सभेमध्ये आरक्षण हटवण्याचा लढा तीव्र करण्याचा निर्धार आगासन गावातील ग्रामस्थांनी केला.

त्याचबरोबर जोपर्यंत आगासन गावातील महापालिकेने टाकलेले अन्यायकारक आरक्षण हटवले जात नाही, तोपर्यंत स्थानिक ग्रामस्थ याचा तीव्र विरोध करतील, असा निर्धार या सभेत करण्यात आला. या सभेला प्रमुख पाहुणे संतोष केणे, मधुकर माळी, तानाजी पाटील, आगासन गाव संघर्ष समिती व गावातील स्थानिक, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आगासन गावातील 13 हेक्टर मध्ये टाकलेला आरक्षण हा अन्यायकारक आहे. महापालिकेने तातडीने हा आरक्षण हटवावा अन्यथा गावकरी उग्र आंदोलन करतील.

- रोहिदास मुंडे, अध्यक्ष, आगासन गाव संघर्ष समिती

पालिकेने आम्हाला जास्त मोबदला दिला तरी आम्ही आमची जागा सोडणार नाही. दिवा शहरात विविध ठिकाणी अजूनही आरक्षित जागा शिल्लक आहेत. त्यातील शासकीय हॉस्पीटलची जागा, प्रभाग समिती कार्यालयाची जागा अजून रिकामी असून त्या जागा पालिकेने घेऊन त्यावर हॉस्पीटल आणि प्रभाग समिती कार्यालये उभारावीत. आम्ही आमची जागा देणार नाही.

- उदय मुंडे, स्थानिक, आगासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com